Sunday, 3 May 2020

Uthav from the end of the 1856 to 19th centuries (१८५८ ते १९ व्या शतकाअखेरचे उठाव)


१८५८ ते १९ व्या शतकाअखेरचे उठाव (uthav from the end of the 1856 to 19th centuries)

या कालखंडात मुख्यतः दख्खनचे दंगे म्हणजे शेतकरी उठाव ( १८५७ ) व तदनंतरच्या मुद्याचा भाग म्हणून वासुदेव बळवंत फडके,  चाफेकर बंधू, वि. दा. सावरकर, कान्हेरे इत्यादीचे प्रयत्न व उठाव याची नोंद घेता येईल. या सोबत इतर अनेक प्रयत्न ही नोंदविता येतील.  यातून ब्रिटिशविरोधी व अखंड चालणाऱ्या सशस्त्र उठावाची माहिती मिळते. महाराष्ट्रभर यातून विरोधाची तीव्र लाट उभी झाली. लो. टिळकांसारख्यांची प्रेरणा त्याला अधिक बळकट करीत राहिली.  
Uthav from the end of the 1856 to 19th centuries (१८५८ ते १९ व्या शतकाअखेरचे उठाव)
Uthav

( १ ) शेतकरी उठाव (farmer uthav)

वरकरणी शांत वाटणाऱ्या मुंबई इलाख्यात १८५७ च्या उन्हाळ्यात घडलेल्या शेतकरी उठावाने पुढील २५ वर्षांपर्यंत परिणाम उमटले व सरकारला आश्चर्यचकित केले.  सामाजिक व आर्थिक क्षेत्रात परिणाम करणारी ही घटना ठरली. एलफिन्स्टनच्या कालखंडात महाराष्ट्रात रयतवारी प्रथा लागू झाली. रॉबर्ट कीथ प्रिंगेलचे उपयुक्ततावादी तत्त्वज्ञान,  रयतवारी, नोकरशाही, नवे कायदे यातून नव्या युगाचे नवे वारे आले. पूर्वी शेतकरी वर्गाचा गावपंचायतीवर प्रभाव असायचा व सावकार कर्ज देऊन प्रकरण वाढले तर पंचायतीसमोर काही करू शकत नसे.  इ. स. १८१८ पासून सामाजिक व आर्थिक ध्रुवीकरण सुरू झाले. शेतकरी - सावकार, शेतकरी - सरकार संबंध बदलले. महसूल ठरवण्यात पाटलाचे महत्त्व संपले.  
        सावकारी कर्ज शेतकरी घेतच होता,  पण त्याचे वाढीव उत्पन्न सावकार घ्यायचे.  कायद्याने सावकारांना मदत लाभली. सावकार ३० % ते ६० % व्याज घेत.  जमिनीची गहाणखते लिहून घेत. इंदपूरचा असिस्टंट कलेक्टर वार्टलफ्रिअरचा १८६३चा अहवाल,  १८४४ मधील पुण्याच्या असिस्टंट कलेक्टर मायकेल रोझचा अहवाल, अहमदनगर जिल्ह्यातील इ. स.  १८३९ मधील ५००० खटल्यांची संख्या व जमिनीचे हस्तांतर प्रा. रवींद्रकुमारच्या नोंदीनुसार ७५ % शेतकरी कर्जबाजारी असणे,  पुण्याकडील ९० % शेतकरी कर्जात बुडणे, पेडरचा गव्हर्नरच्या कार्यकारी मंडळ सदस्य म्हणून अभ्यास अहवाल, विल्यम वेडरब द्वारा शासनाला दोषी मानणे,  १८५९ च्या कायद्याने सावकारांना ३ वर्ष खटल्यासाठी मुदतवाढ, या सर्व बाबी अत्यंत बोलक्या ठरतात. इंदापूर, हवेली, पुरंदर तालुका व इतर गावांचा विद्वानांनी केलेला अभ्यास यावरून या उठावाचे स्वरूप व गांभीर्य कळले. 

 २ ) कारणे या उठावाची

 अनेक कारणे विशेष अभ्यासक व विद्धान प्रा.  रवींद्रकुमार, प्रा. इयान कॅटनेंच, प्रा.  डॉ. धनागरे, इत्यादीनी पुढीलप्रमाणे दिली आहेत,  
( १ ) शेतकऱ्यांची जन्मजात गरिबी,  हलक्या प्रतीच्या जमिनी, प्रतिकूल हवामान व अनियमित उत्पन्न 
२ ) घटते उत्पादन 
( ३ ) शेतकऱ्याचे अज्ञान व दूरदर्शीपणाचा अभाव 
( ४ ) पूर्वापार कर्ज,  पिढीजात कर्ज फेडण्याची असमर्थता 
( ५ ) शेतकऱ्यांची सणवारप्रसंगी जादा खर्च करण्याची वृत्ती 
( ६ ) सुधारित जमाबंदीमुळे शेती सुधारण्यासाठी काढलेले वाढीव कर्न 
( ७ ) १८५९चा मुदतीचा कायदा 
( ८ ) पाऊसपाणी लक्षात न घेता तीस वर्षाची जमाबंदी पद्धत 
( ९ ) पावसाचे घटते प्रमाण व अवेळी आगमन
( १० ) निर्वाहापुरते उत्पन्न 
( ११ ) नव्या कायद्याने कर्ज वसुलीसाठी सावकारांकडून मिळालेले प्रोत्साहन 
( १२ ) अमेरिकन यादवी युद्धामुळे तात्पुरती आलेली सुबत्ता व पुन्हा शेतमाल किमतीची घसरण तसेच यामुळे शेतमालाचा उठाव न होणे.  
( १३ ) जमाबंदीचे ५० ते ६० टक्के वाढीव दर अशा विविध कारणांमुळे सामान्य शेतकरी बिथरले व त्यांनी बंडाचे निशाण घेतले.  भिमथडी तालुक्यात सारा वाढला. तो भरण्यासाठी ४३४१ शेतकऱ्यांना जमिनी विकाव्या लागल्या.  
        पुण्यातील सार्वजनिक सभेने नव्या जमाबंदीविषयी टीका केली.  पुणे, सोलापूर, सातारा व अहमदनगर या जिल्ह्यांत अराजकता वाढली.  यास सार्वजनिक सभा जबाबदार आहे असे प्रा. जेम्स मॅसिलॉसचे मत होते.  हे मत चूक होते. त्याला शासकीय धोरण जबाबदार होते. ' डेक्कन रॉयटस कमिशन ' नेमून चौकशी कार्य सुरू झाले.  या समितीचे सभासद पूर्णत : नव्या जमाबंदीच्या धोरणाला, या उठावाचा दोष देतात. या उठावाचा प्रसार पुणे जिल्ह्यातील शिऊर तालुक्याच्या कर्धे गावापासून सुरू झाला.  मारवाडी सावकारांवर हल्ले झाले. 
खरा उठाव १२ मे १८७५ पासून सुरू झाला.  मारवाडी, गुजर, सावकारावर सुपे भागात हल्ले झाले.  पुणे, अहमदनगर, सोलापूर, रत्नागिरी व अहमदाबाद जिल्ह्यात हा उठाव पसरला.  सावकारांना लुटणे, गहाणखते जाळणे, लुटमारी करणे, दरोडे, इत्यादी घटनांनी सर्वत्र कहर केला.  शेकडो लोक सरकारने पकडले. गुन्हा सिद्ध झाला त्यांना शिक्षा व निर्दोषांना सोडले 
गेले.  ' डेक्कन रॉयटस कमिशन ' ने म्हटले आहे - “ मध्यमवर्गीय शेतकऱ्यांनी जरी पाठिंबा दिला असला तरी सुरुवात मात्र श्रीमंत शेतकऱ्यांनी केली.  नवा कायदा, ब्रिटिश राजवट यांमुळे समाजातील प्रतिष्ठित वर्गाला आव्हानं प्राप्त झाले होते. तेव्हा आपले महत्त्व टिकविण्यासाठी श्रीमंत वर्गांनी मध्यमवर्गीय शेतकऱ्यांना पाठिंबा देऊन हा उठाव घडवून आणला.  या उठावात सामान्य व्यक्तीला कोणताही त्रास झाला नाही.  
      या उठावाच्या परिणामी ' द डेक्कन ॲग्रिकल्चरल रिलीफ अॅक्ट ' ( १९७९ ) मान्य झाला.  त्यात पुढील महत्त्वाच्या योजना होत्या त्यामुळे कर्जबाजारी शेतकऱ्याची स्थिती सुधारण्यासाठी धडपड करण्यात आली.  शेतकऱ्याचे कर्ज एकदाच वसूल करू नये. यथाशक्य प्रकरणे रजिस्टरमध्ये नोंदवावीत, कर्ज तारण खेड्यात नोंदवावे वरजिस्टर ठेवावे.  प्रकरणे शक्यतो मुन्सफकडे स्थानिक स्तरावर सोडवावे. निकाल मान्य नसेल तर दिवाणी कोर्टामार्फत निकाल - व्हावा. कोर्टाने गरज असेल तर हसे करून वसुली मान्य करावी,  व्याजदर कमी करावा. सावकाराला शेतकऱ्याची जमीन अत्यंत निकड वाटल्याशिवाय खरेदी करण्यास कोर्टाने मज्जाव करावा, शेतकऱ्यांना ' तकावी ' ची सोय असावी व नवीन उपाय म्हणून शेतकरी बँका ' सुरू कराव्यात.  अशा प्रकारे तळागाळातील शेतकरी वर्गाला शांत करण्याचा प्रयत्न झाला.  
( ३ ) वासुदेव बळवंत फडकेंचा उठाव महाराष्ट्रात संघटित स्वरूपात ब्रिटिश सत्तेला आव्हान देणारे वासुदेव बळवंत फडके भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील सशस्त्र लढ्याचे आद्य प्रवर्तक ठरतात.  त्यांचा जन्म कुलाबा जिल्ह्याच्या शिरढोण गावी इ. स. १८४५ साली झाला. त्यांच्या घराण्याकडे कर्नाळा किल्ल्यांची किल्लेदारी होती. वडील सुभेदार म्हणवत पण आर्थिक स्थिती सामान्य होती.  शिक्षण जास्त घेता आले नाही, थोडे इंग्रजी शिकले. वासुदेवांनी इ. स. १८६३ मध्ये पुण्याच्या ' मिलिटरी अकाऊंटस ' कार्यालयात नोकरी केली खरी पण त्यांना मनापासून इंग्रजाबद्दल तिटकारा होता.  ते खूप भावनाशील होते. त्यांनी नोकरी सोडली ती इंग्रजी अन्यायी व अमानवीय वागणुकीमुळे. कारण त्यांची आई खूप आजारी पडली. अंतिम दर्शनाला त्यांना सुटी मिळाली नाही. हे दु : ख उरात घेऊन त्यांनी नोकरी 
त्यागली.  
        नदेशप्रेमाची व स्वदेशाबद्दलची तीव्र भावना त्यांना स्वस्थ बसू देईना.  पुण्याच्या तरुणांत त्यांनी देशप्रेम जागृत केले. त्याच्या मनात शस्त्रप्रेम व सामर्थ्याचा वापर करून स्वातंत्र्य मिळवावे लागेल यावर विश्वास होता.  न्या. रानडे, सार्वजनिक काका
सारख्या व्यक्तींचा सार्वजनिक सभेतील उपस्थितीमुळे त्यांच्यावर परिणाम झाला.  देशप्रेम, स्वदेशाची आवड वाढली. इ. स. १८७३ पासूनच ही भूमिका त्यांनी शपथपूर्वक स्वीकारून ' ऐक्यवर्धिनी संस्था ' स्थापन केली.  
       फडक्यांनी इंदापूरकर व वामनराव भावे यांच्यासोबत ' पूना नेटिव्ह इन्स्टिट्यूशन ' सुरू केली.  रविवारी सार्वजनिक भाषण करून इंग्रजावर टीका करीत. ते म्हणत - " स्वराज्य स्थापित झाल्याशिवाय रयतेची दु : खे नाहीशी होणार नाहीत.  इंग्रज केवळ स्वत : चे सुख पाहतात. येथील जनतेसंबंधी त्यांच्या मनात तीळमात्र प्रेम नाही. ” हळूहळू ते खेडेगावीही प्रचारास जाऊ लागले.  बडोद्याच्या गायकवाड महाराजांना सरकारने पदच्युत केले, यामुळे फडकेंनी व सार्वजनिक सभेने एक लाख रुपये गोळा करून दिले. त्यांच्या मनावर या घटनेने ब्रिटिश विरोधी ठसा दृढ झाला.  लॉर्ड लिटनचा काळ आला. या व्हाइसरॉयच्या काळात दडपशाही कायदे, दिल्ली दरबार व राणीला हिंदुस्थानची साम्राज्ञी घोषित करण्यात आले. वासुदेव व्यथित झाले. गुप्तपणे तलवार, दांडपट्टा,  भाला, बारची बंदूक, इत्यादी हत्यारे चालविणे त्यांनी लहुजी मांग व राणबा महार यांच्याकडून शिकून घेतले. गुप्त संघटना करून सशस्त्र लढ्यानेच इंग्रजांना हाकलता येईल हे विचार मानणारे मित्र गो.  मो. साठे, वि. पि. गद्रे व गो. ह. कर्वे हे होते.  
       त्यांनी दौलत नाईकांशी ओळख करून साथ मिळविली. 
श्री दत्तात्रय महात्म्य हा सात हजार ओव्यांचा ग्रंथ हस्तलिखित बनविला.  गुरुचरित्राची प्रतही केली. ईश्वर आराधनेने २० फेब्रुवारी १८७९ रोजी कार्यारंभ करून धामारीला पहिला दरोडा घातला.  मारहाण न करणे, स्त्रियांना स्पर्श न करणे, दागिने न घेणे, फक्त रोकड रक्कम घेणे असे स्पष्ट आदेश असावयाचे. साधुवेषातील हे ' महाराज ' प्रभावी झाले.  लोणी कंद ( २५ ते २७ फेब्रुवारी ) ला साथ मिळवून रामदरच्या जंगलात गेले. हळूहळूवाल्हागाव लुटले. रक्कम - कपडा मिळाला. मार्च १८७९ मध्ये हर्णे लुटले. आता कोळीही सोबत होते.  मगदरी, सोनपूरही लुटले. वरसगावला धनगर जुडले. मनुष्यबळ १५० झाले. मेजर डॅनियल त्यांच्या मागावर असून शोध घेत होता. रु. ४००० / चे बक्षीस घोषित केले. डॅनियलच्या मदतीला कर्नल क्रिस्पिन,  मेजर फुलटन व कॅ. ब्रेन जोडण्यात आले. फडक्यांनी कोकण गाठले.          
            फडक्यांनी जाहीरनामा काढला.  त्यानुसार “ डाक, तार, आगगाड्या बंद करा.  तुरंगे मोकळी करा. लहान बंडातून चमत्कार होईल.  इंग्रजांना हाकलून लावून प्रजासत्ताक राज्यस्थापन करण्याचा आपला हेतू तडीस जाईल.  
     " रामोशी स्वार्थाकडे वळले.  फडके गाणगापूरकडे गेल्यावर १३ मे १८७९ मध्ये विश्रामबागेला आग लावली गेली.  बदनामी फडक्यांची झाली पण कृत्य केशव रानडेचे होते. हे नंतर स्पष्ट । झाले.  १८७६ च्या दुष्काळामुळे लोक अन्नान्नदशेला लागले होते. वासुदेवांना अनेक साथीदार लाभत गेले.  प्रारंभी श्रीमंताविरुद्ध त्यांनी मोहीम केली. ती आता इंग्रज व युरोपियनाविरुद्ध घोषित केली. १८५७ सारखे दुसरे बंड उभे करण्याची त्यांनी घोषणा केली.  फडक्यांच्या दुसऱ्या जाहीरनाम्यात गव्हर्नरला ठार करणाऱ्यास दहा हजाराचे बक्षीस, इतर अधिकारी ठार करणाऱ्यास पाच हजाराचे बक्षीस ठेवले. सरकार त्यांना ' लुटारू ',  ' दरोडेखोर ' किंवा ' माथेफिरू ' व ' अत्याचारी ' म्हणून संबोधू लागले. त्यांनी आत्मचरित्र लिहून आपल्या देशबांधवाना स्वत : चा खरा परिचय करून दिला. ते गाणगापूरला आहेत म्हणून कळताच पाठलाग झाला.  ते निसटले. देवर नावडगीच्या बुद्ध विहारात ते तापाने आजारी असताना २० जुलै १८७९ मध्ये डॅनियलद्वारा पकडले गेले. त्यांच्यावर खटला चालविला गेला. काळ्या पाण्याची शिक्षा झाली.  
      महादेव चिमणाजी आपटेनी बचावाचा प्रयत्न केला पण तो निष्फळ ठरला.  एडनला जन्मठेप झाली. तेथून निसटण्याचा असफल प्रयत्नही त्यांनी केला होता.  शेवटी हा नरसिंह १७ फेब्रुवारी १८८३ रोजी इहलोक सोडून गेला. अपमानास्पद गुलामगिरीपेक्षा आनंदाने मृत्यूस कवळाटणारा हा पुरुष बंकिमचंद्र चटर्जीच्या ' आनंदमठ ' कादंबरीची प्रेरणा ठरला असे मत इतिहासकार य.  दि. फडकेंनी व्यक्त केले. त्यांचे बलिदान व्यर्थ झाले नाही. त्यांच्या कार्याच्या प्रेरणेतूनच पुढे शेकडो - हजारोंनी हा सशस्त्र लढा दिला. 

No comments:

Post a comment