Tuesday, 5 May 2020

Let go of the agitation and the challenge of the agitation (चले जाव आंदोलन)


चले जाव आंदोलन (Let go of the agitation and the challenge of the agitation)

चले जाव आंदोलनास कारणीभूत परिस्थिती
 १ ) क्रिप्स वाटाघाटी फिसकटल्यामुळे देशात नैराश्याची व 
वैफल्याची भावना पसरली.  युद्धाचे भीषण पाश आढळले जात असूनही ब्रिटिश राज्यकर्ते हिंदी लोकांच्या सत्ता सोपवण्यात तयार नाहीत हे क्रिस्प वाटाघाटी फिसकटल्याने सिद्ध झाले.  ब्रिटिशांचे हृदय परिवर्तन करण्यासाठी वैयक्तिक सत्याग्रह अपुरा पडला. त्यापेक्षा आणखी काही केले पाहिजे असे काँग्रेस नेत्यांना वाटू लागले.  
Let go of the agitation and the challenge of the agitation (चले जाव आंदोलन)
महात्मा गांधी

२ ) ब्रिटिशांचे भारतावर राज्य आहे म्हणून जपानने भारताकडे आगे-कूच केली आहे.  जपान-च्या वाढत्या आक्रमणात ब्रिटिश राज्यकर्ते रोख शकत नाही, असे भारतीयांना दिसून आले.  भारतास स्वातंत्र्य दिल्यास जपानला भारतावर आक्रमण करण्याचे कारण वाटणार नाही. आक्रमण मागे घ्यावे अशी भारतीय नेते जपानला विनंती करतील,  त्याप्रमाणे जपान वागेल पण त्याप्रमाणे जपानने न केल्यास स्वतंत्र भारतातील सर्व राष्ट्रीय सामध्ये एकत्र येऊन जपानला तोंड देतील. भस्मासूराची वक्र दृष्टी भारता कडे वळण्यास कारण म्हणजे ब्रिटिशांचे राज्य ! ब्रिटिशांचे राज्य हे सर्व दोषांचे मूळ कारण ! ' भारत सोडून चालते व्हा ' असे ब्रिटिशांना सांगणे नैतिकदृष्टया समर्थनीय ठरते असे म.  गांधीना वाटले. म्हणून म. गांधींनी १९ एप्रिल १९४२ पासून ' ब्रिटिशांनी वेळीच भारत सोडून जाणे भारताच्या व ब्रिटनच्या हिताचे आहे ' असे प्रतिपादन करावयास सुरुवात केली.  
३ ) ब्रिटिश भारताचे संरक्षण करण्यास असमर्थ आहेत.  सिंगापूर, मलाया, ब्रह्म-देशातून माघार घेताना ब्रिटिशांनी तेथील जनतेला जपान्यांच्या दयेवर सोडून दिले.  तीच गोष्ट भारतात होऊ नये म्हणून ब्रिटिशांनी वेळीच भारत सोडून जावे व भारत जपान्यांच्या ताब्यात देण्याऐवजी भारतीयांच्या ताब्यात देऊन जावे.  

४ )  रंगूनमध्ये जपानी आक्रमणाचा वेळी ब्रिटिश राज्यकर्यांनी आपली जबाबदारी पार पाडली नाही.  बहुसंख्य जनतेस शत्रूच्या दयेवर सोपवून युरोपियन लोकांना सुरक्षिततेसाठी तेथून हलविले ' असा ठराव अलाहाबादच्या ऑल इंडिया काँग्रेस कमिटीने सम्मत केला ( मे १९४२ ) पण तो ठराव प्रसिद्ध करण्यास सरकारने मनाई केली.  पोलिसांनी अलाहा बादला काँग्रेस कार्यावर घेरा टाकून कागदपत्र ताब्यात घेतले. वांशिक भेदभावान सार युरोपीयनांची कातडी बचावण्याची प्रवृत्ती पाहून हिंदी लोकांना राग आला व त्यांनी ब्रिटिशांना ' चले जाव ' म्हटले.  
५ ) युद्ध काळात शत्रराष्ट्रानी बिटिशांविरूद्ध प्रचारासाठी भारतीयांचे साहाय्य घेतले.  नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी बलिनच्या आझाद हिंद रेडिओवरून ब्रिटिशविरोधी प्रचार सुरू केला.  त्यामुळे भारतीयांत ब्रिटिशां विरोधी भावना निर्माण होऊन ते ब्रिटिशांना ' चले जाव ' म्हणण्यास प्रवृत्त झाले असावे. 

६ ) महायुद्धकाळात महागाई भरमसाट वाढून जनतेचे दैनंदिन जीवन असह्य बनले होते.  ह्यातून सुटका करण्यासाठी एक मार्ग आढळला व तो म्हणजे भारतातून ब्रिटिशांनी निघून जावे हा.  ' 

महात्माजींचा आदेश

महात्माजींचा आदेश म.  गांधीनी हरिजन वृत्तपत्रातून चले जाव संबंधीचा दृष्टिकोन मांडला प्रेस्टन ग्रीव्हर,  लुई फिशर इ. जागतिक कीर्तीच्या वृत्तपत्रकारांना व वार्ता हरांना मुलाखती दिल्या व मार्शल चंग - कै - शेक,  प्रे. रुझवेल्ट पत्रे लिहून आपला ' भारत छोडो ' संबंधीचा दृष्टीकोन स्पष्ट केला. वर्धा येथे काँग्रेस वर्किग कमिटीच्या बैठकीत ( १४ जुलै ) चले जाव धमकीचा ठराव.  पास झाला व ऑल इंडिया काँग्रेस कमिटीने मुबईच्या बैठकीत ( ८ ऑगस्ट १९४२ ) ठरावास मान्यता दिली.  
  वर्धाच्या कांग्रेस बकिंग कमिटीत ठराव पास झाल्यावर ठराव स्पष्ट करून सांगण्यासाठी ब्रिटिश लष्करी अधि कायची कन्या मिस् स्लेड ( कु.  मिराबेन ) दिला गव्हर्नर जनरलकडे पाठविले. पण ग. ज. ने भेटावयाचे नाकारले. तेव्हा वर्ध्याच्या ठरावात चले जाव आंदोलन अहिंसात्मक लढयाची धमकी दिली होती तर मुंबईच्या ऑ.  इं. का. क. च्या बैठकीत अहिंसात्मक लढण्यास मान्यता दिली. लढ्यास मार्गदर्शन करण्यासाठी काँग्रेस समित्या कदाचित अस्ति त्वात राहाणार नाहीत. 
      काँग्रेसने दिलेले आदेश जनतेपर्यंत पोहोचणार नाहीत अशा अवस्थेत प्रत्येक स्त्री - पुरुषाने स्वतःच स्वतःचा मार्गदर्शक समजून स्वातंत्र्यासाठी अहिंसेच्या चौकटीत अविश्रांत श्रम करावेत.  हा लढा केवळ काँग्रेससाठी नसून सर्व देशासाठी भारताला मिळणारे स्वातंत्र्य कांग्रेससाठी नसून सर्व जनतेसाठी, असेल. असा म. गांधींना आदेश दिला व जाहीर केले की हे उघड बंड आहे, यात काहीही गुप्तता नाही,  प्रत्येकजण स्वतंत्र समजून प्रत्येकाने आपला मार्ग ठरवावा. आपण एकतर स्वातंत्र्य मिळवू या किंवा स्वातंत्र्य मिळविण्याच्या प्रयत्नात मरू या, ' करेंगे या मरेंगे ', Door die 1


चले जाव ' ठराव हे एक आवाहन (चले जाव आंदोलन)


 ' चले जाव ' ठराव हे एक आवाहन ८ ऑगस्ट १९४२ रोजी चले जाव ठराव विचारात घेतेवेळी कम्यु निस्टांनी विरोध केला,  तेव्हा पं. जवाहरलाल नेहरू म्हणाले, ' चले जाव ठराव हे आव्हान नाही, ते एक आवाहन आहे, स्पष्टीकरण आहे, सहकार्याच आश्वासन आहे.  स्वतंत्र भारताच्या सहकार्याचे ते आश्वासन. इतर कोणत्याही मुद्यावर सहकार्य नाही.  
            ' आठ ऑगस्ट रोजी ठराव पास दुसऱ्या दिवशी नऊ,  ऑगस्टला परत बैठक भरणार होती व त्यात म. गांधी बोलणार होते.  सामुदायिक अहिंसात्मक चळवळ सुरू करण्याच्या अगोदर सरकारशी बोलणी कोणत्या तत्त्वावर होणार हे ते स्पष्ट करून सांगणार होते.  पण त्या अगोदर मोठ्या पहाटेस ऑ. इं. कां. क. च्या सर्व सभासदांना अटक करण्यात आली. म. गांधी महादेवभाई देसाई, मिराबेन यांना पुण्याच्या आगाखान पॅलेसमध्ये स्थानबद्ध केले.  काँग्रेस वकिंग कमिटीच्या सभासदांची अहमदनगरच्या तुरुंगात रवानगी केली.  

' चले जाव ' ठरावासंबंधी प्रतिक्रिया


        ' चले जाव ' ठरावासंबंधी प्रतिक्रिया चलेजाव ठरावासंबंधी इतर पक्षांची प्रतिक्रिया : - वर्धा को.  क. ने संमत केलेल्या ठरावाबद्दल स्वागत झाले त्याचबरोबर निषेधही झाला. चलेजाव ठराव म्हणजे काँग्रेस राज्यापुढे ब्रिटिशांना नमविण्याचा प्रयत्न आहे,  असे बॅ. जीना म्हणाले. ब्रिटिशांबरोबर मुसलमानांनाही ही धमकी आहे असे समजून मु. लीगने चले जाव ठरावास पाठिंबा दिला नाही व डिसें. १९४३ च्या अधिवेशनात ' Divide and Quit ' ( फाळणी करा आणि जा ) अशी मुस्लीम लीगने घोषणा केली.  काँग्रेसच्या धोरणास पाठिंबा देऊ नये असे स्वा. सावरकर आणि स या लिबरल नेत्यांनी ( ' सविनय कायदेभंग ' ) चळवळ देशाच्या संरक्षणास व हितास घातक आहे, म्हणून मागे घेण्यात यावी, असे सांगितले. कम्युनिस्ट पक्षाचे जनरल सेक्रेटरी पी.  सी. जोशी यांनी भाईना सांगितले की, कांग्रेस नेत्यांनी सांगितलेला मार्ग हा स्वातंत्र्य प्राप्तीचा नसून ' स्वातंत्र्ययुद्धातून राष्ट्रास मागे खेचण्याचा आहे. ' म्हणून भाईंनी आंदोलनात भाग घेऊ नये. रशियाच्या हितविरोधी असे काहीही करू नये.  ब्रिटिशांच्या युद्धप्रयत्नात मदत करण्यातच रशियाचे हित सामावलेले आहे. ' अशी भाईची श्रद्धा होती. ब्रिटिश - अमेरिकन वृत्तपत्रांनी ' चले जाव ' आंदोलनाचा धिक्कार केला. ब्रिटिश राज्यकर्त्यांनी चले जाव आंदोलन हे ' जाहीर बंड ' ठरविले. ब्रिटिश लेबर पार्टीच्या नेत्यांनी म.  गांधींवर वैयक्तिक हल्ले चढविले. 


उघड बंडाचा पसरलेला वाणवा


काँग्रेस नेत्यांच्या धरपकडीची वार्ता आल्याबरोबर त्या दिवशी ( नऊ ऑगस्ट ) मुंबई,  पुणे, अहमदाबादमध्ये निदर्शने झाली. १० ऑगस्टला दिल्ली व उत्तरप्रदेशातील शहरात वणवा पसरला.  ११ ऑगस्टपासून सर्व भारत ' चले जाव ', करेंगे या मरेंगे ' घोषणांनी खळबळून गेला. ब्रिटिश सरकार जागरूक असूनही सरकारला तीन महिन्यापर्यंत उघड बंडाचा ' वणवा शांत करता आला नाही.             
           काँग्रेस वकिंग कमिटी,  ऑ. इ. कॉ. क ; प्रांतिक काँग्रेस समित्या बेकायदा ठरविल्या.  अखिल भारतीय, प्रांतिक, जिल्हा, तालुका पातळी वरील काँग्रेस नेते तुरुंगात टाकले.  जनतेस मार्गदर्शन करण्यासाठी एकही नेता मोकळा ठेवला नाही. नेत्याशिवाय जनता काहीही करू शकणार नाही व शांत राहील हा सरकारचा हिशोब चुकला.  चले जाव आंदोलनास पाठिंबा न देणारे मु. लोग, हिंदु महासभा, कम्युनिस्ट, लिबरल इ. पक्ष समाजात रुजले नव्हते. तशी कल्पना काँग्रेसपक्षाबद्दल करून घेणे चुकीचे होत १९२० नंतर म.  गांधींनी काँग्रेसची चळवळ खेडोपाडी पसरविली होती. काँग्रेस नेत्यांना अटक होताच जनतेने ' चले जाव ' चा आपल्या बुद्धीप्रमाणे अर्थ लावून तीन महिन्यापर्यंत चळवळ चालू ठेवली. हरताळ, निषेधसभा,  निदर्शने केली. दळणवळण व संदेशवाहन तोडण्यासाठी तारा तोडल्या रेल्वे रुळ उखडले. मोटारी, बसेस, ट्रामगाड्या जाळल्या. मुंबई शहरातील खाजगी वाहनात खादी टोपीवाला जर आत नसेल तर सर्व खाजगी वाहने,  मोटारी, तांगे अडविले. झाडे तोडली, रस्त्यावरील दिवे फोडले, दुकाने लुटली, लुटीचा धाक दाखवून पैसे उकळले, तार - टपाल - रेल्वे कार्यालये जाळली व नासधूस केली. इलेक्ट्रिक पॉवर हाऊसवर हल्ले चढविले.  सरकारी व सार्वजनिक इमारती जाळल्या, पोलीस चौक्या जाळल्या. पोलीस ठाण्यावर हल्ले चढविले. प्रसंगी पोलीस व पोलीस अधिका - यांना ठार मारले. कम्युनिस्टांनी आंदोलनात भाग न घेतल्याकारणाने उत्पादन.
      करणारे खाजगी व सरकारी कारखाने मोडतोडीपासून अलिप्त राहिले.  नासधूस - संप यावर भर देणान्या कम्युनिस्टांनी रशियाखातर अधिक उत्पादनावर भर दिला कम्युनिस्ट प्रभावळीपासून अलिप्त असलेल्या अहमदाबादमधील मजूर संघटनेने मात्र तीन महिने यशस्वीरीत्या संप घडवून आणले.  संपवाल्या मजुराना बड्या लोकांनी आर्थिक मदत केली. फक्त तीन - चारच गिरण्या बंद पडल्या. काँग्रेस प्रभावळीखाली असलेल्या जमशेटपूरच्या टाटा आयनं व स्टील वक्समधील वीस हजार कामगारांनी संप केला. ' काँग्रेस नेते मुक्त करण्यासाठी व राष्ट्रीय सरकार स्थापन करण्यासाठी सरकारकडे वाटाघाटीचे प्रयत्न करू ' असे आश्वासन चालकाकडून मिळाल्यावरच कामगारांनी संप मागे घेतला.  
       रेल्वे रुळ उखडणे,  सिग्नल कॅबीन पाडणे इत्यादीमुळे ठिकठिकाणी रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली.  बिहार व उत्तर प्रदेशातील पूर्व भाग यात काही आठवडे वहातूक बंद होती. बंगालचा उत्तर प्रदेशाशी संबंध तुटला.  गंटर व बेझवाडा जिल्ह्यात रेल्वेला नुकसान पोहोचविल्याने त्या जिल्ह्यांचा मद्रासशी संबंध तुटला. मद्रास मेल काही दिवस बंद पडली.  तर काही दिवस फक्त दिवसाच कमी वेगात प्रवास करी. बेझवाडा ते चित्रगुंटा यातील १३० मैलांचा रेल्वेमार्ग विस्कळीत झाला.  
      

 ' विद्यार्थ्यांची कामगिरी


चले जाव आंदोलनात विद्यार्थ्यांनी विशेषतः हिंदू विद्यार्थ्यांनी हिरी रीने भाग घेतला.  पिकेटिंग केले, सरकारी हकम धाब्यावर बसवून सभा मिरवणुका घेतल्या. तारा तोडल्या, मोडतोड केली.  अलीगढ़ विधीपीठा खेरीज दिल्ली ते ढाका आणि लाहोर ते मद्रास या दरम्यानची विद्यापीठे, महाविद्यालये,  माध्यमिक शाळा बंद पडल्या. चळवळीच्या सुरुवातीसच बनारस युनिव्हर्सिटीचा ताबा लष्कराला घ्यावा लागला. 

No comments:

Post a comment