Tuesday, 5 May 2020

Organization of landowners and their functions in history

भूमिगतांची संघटना व त्यांची कार्यपद्धती (Organization of landowners and their functions)
Organization of landowners and their functions in history
History

      काँग्रेसचा आदेश शिरोधार्य मानून ब्रिटिशांची सत्ता उखडून टाकण्यासाठी सर्वत्र प्रचंड चळवळ सुरू झाली.  ब्रिटिशांनी अखिल भारतीय पातळीच्या पुढान्यांबरोबर तालुका पातळीवरील पुढाऱ्यांनाही अटक केली. त्यामुळे हळुहळू चळवळीची सूत्रे जनतेच्या हाती जाऊ लागली.  तुरुंगाबाहेर नेत्यानी उघड चळवळ करण्याची भूमिका घेतली. ठिकठिकाणच्या सरकारी कचेऱ्यावर मोर्चे निघू लागले. राष्ट्रीय निशाणे लावण्यात येऊ लागली. पाटण,  वडूज, इस्लामपूर, या ठिकाणी कचेरीवर निशाणे लावण्यांत आली. तासगावला मोठा मोर्चा निघाला. इस्लामपूरच्या मोर्चात पंड्या इंजिनिअर इत्यादी मुले हातात भाले,  कुन्हाडी घेऊन सामील झाली होती. त्यांना पिस्तुलाने पाडण्यात आले. गोळीबार झाला. कित्येक जखमी झाले. वडु ज्या मोर्चामध्ये परशुराम घाडगे हा झेंडा घेऊन आघाडीवर होता.  
      त्यावर गोळीबार होऊन पाच,  सहा जण मृत्यू पावले. सरकारकडून मोठ्या प्रमाणात माणसे मारली जाऊ लागली.  त्यामुळे चळवळीचा पुनर्विचार करण्याची आवश्यकता निर्माण झाली. येरवडा जेल फोडून बाहेर आल्यानंतर किसन वीर व पांडू मास्तर कवठ्यास आले.  नंतर किसन वीर करंजखोपास व पासि निघून गेले. दिवाळी घरी साजरी करून पांड मास्तर पार्ले येथे गेले. श्रीयुत यशवंतराव चव्हाण यांची व किसन वीरांची सैदापूर येथे भेट झाली व कामाची दिशा ठरवण्यात आली.  काही दिवसानंतर ते साताऱ्यास आले. परिस्थितीचे दडपण वाढत चालले होते. अनेक प्रकारच्या अफवा उठत होत्या. 
       चळवळीचे स्वरुप निश्चित करून ती भूमिगत ठेवण्याचा विचार निश्चित झाला होता.  याच वेळी पांडू बोराटे व बापूराव जगताप, शंकरराव जाधव, शिंदे, मुकादम वगैरे नवे जुने कार्यकर्ते लिबास जाऊन तेथून गोव्यास एकत्र आले.
पुढील कार्याची रुपरेषा ठरविण्यात आली.  सातारा जिल्ह्यात वेगवेगळे गट काम करू लागले.  सातारा, कोरे-गांव भागात श्रीयुत किसन वीर, पंत दिवाण व गोखले हे काम करीत होते.  त्यांच्या समवेत श्री. डी. जी. देशपांडे, बाबुराव घोरपडे, बाळकृष्ण घोरपडे, पांडुरंग बोराटे,  बापू कचरे रामराव पाटील, तास-गावकर हे कार्यकर्तेही होते. कन्हाड भागात श्री. यशवंतराव, कासेगावकर वैद्य,  माधवराव जाधव, बाबूराव काळे, बुबा मावशोकर, भिकोबा किवळकर, वाळे भागात बरडे मास्तर, दक्षिण भागात बाबुराव चरणकर,  गणपत बिअसकर, शेख काका, बाबूजी पाटणकर, निवृत्ती काका, जोशी काका, सांगली तासगाव भागात श्री. वसंतराव पाटील, खानापूर भागात नाना पाटील,  नाथाजी लाड, जी. डी. लाड आणि पूर्व भागात बस्ताद इत्यादी मंडळी आपापल्या विभागात स्वतंत्रपणे कार्य करीत होती.  
       ही स्थिती १९४३ एप्रिल अखेर यशवंतराव पकडले जाईपर्यंत टिकून होती.  ते पकडले गेल्यानंतर मात्र कार्यकर्ते आप पल्या परीने व विचाराने, काही भूमिगत राहिले.  काहींनी सुतारगवं ड्याच्या हाताखाली कामे घेतली. अशा त - हेने : विखुरलेल्या या सर्व कार्यकर्त्यांना एकत्र आणून भूमिगताची एक भक्कम संघटना निर्माण करण्याची आवश्यकता निर्माण झाली.  कन्हाड वगेरे भागातील लोक प्रथम एकत्रित झाले व उत्तर विभागात किसन वीरांच्याकडे आले. ही सर्व मंडळी कोरेगावशेजारी एकसळ येथे श्रीयुत दादासाहेब साखळकर यांच्याकडे एकत्रित आली. यावेळी किसन वीरांनी जिल्ह्यातील भूमिगतांची संघटना उभारण्यास आपली सम्मती दिली.  अशा रीतीने सर्व सातारा जिल्हा एकत्र आला. या सर्वांना एकत्र आणण्याचे काम धन्वंतरी कासेगावकर वैद्य यांनी केले.

      कार्याची रूप-रेषा 
 भूमिगतांची संघटना उभारताना कार्यांची रूपरेषा निश्चित करण्यात,  आली. यात सत्ताकेंद्राचे विध्वंसन करणे, तारेचे दळणवळण बंद पाडणे,  डाक, रहदारी बंगले व कचेन्या, पोस्टाच्या थैल्या यांचा विध्वंस करणे, 
मालगाड्या लुटणे वगैरे गोष्टींचा समावेश होता.  
         परंतु हे करीत असताना कार्यकर्त्यांनी पाळावयाची पथ्येही ठरविण्यात आली.  सरकारवर हल्ला करतांना हिंसा करावयाची नाही व खाजगी मालमत्तेचे नुकसान करावयाचे नाही,  याची स्पष्ट जाणीव सर्व कार्यकर्त्यांना देण्यात आली.  
        ही चळवळ चालवीत असताना गटवार सर्वाधिकारी
(डिक्टेटर ) निवडण्यात आले होते.  सुरवातीस श्रीयुत यशवंतराव कार्य करताना या कार्यकर्त्यांनी परस्परांना टोपण नावानी संबोधण्यास सुरुवात केली.  श्री. किसन वीर हे आबासाहेब, कोसे गावकर वैद्य हे धन्वंतरी, श्री. पांडुरंग बोराटे हे तात्या आणि बापू कचरे,  दिवाणजी या नावाने ओळखले जाऊ लागले. श्रीयत किसन बीरांचे आबासाहेब नाव त्यावेळी प्रचलित झाले व आजही ते अत्यंत लोकप्रिय आहे.  
      ठरलेल्या कार्यक्रमानुसार तारा तोडण्याचा जिल्ह्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला.  सुमारे २००० खांब तोडण्यात आले. तारा तोडण्याची एक वेगळी युक्ती या लोकांनी अमलात आणली होती.  तारांवर दोरखंड टाकून त्या खाली ओढायच्या व कुन्हाडीने त्याचे तुकडे करावयाचे. दोरखंडानेच खांबा वाकवावयाचा व तुकडे करायचे.  
         हे काम इतक्या तीव्र गतीने झाले की,  या कार्यकर्त्यांना परकीयांचे साहाय्य असावे.  त्यांच्याकडून त्याना साधनेही मिळाली असावीत, असा सरकारी रिपोर्ट झाला.  याचबरोबर सरकारी बंगले जाळण्याचा कार्यक्रमही हाती घेण्यात आला. त्यानुसार नेर,  खातगुण येथील डेपो व उडतारे वगैरे ठिकाणचे बंगले जाळण्यात आले. अशा प्रकारे चळवळीला उग्र स्वरूप येत होते.  या क्रांतीची सुरुवात अहिंसामय मार्गाने झाली.  
       शांततामय मार्गाने नेलेल्या मोर्चावर पोलिसांनी अमानुषपणे हल्ला चढविला,  त्यात स्त्रिया व लहान मुलांनाही पोलिसांच्या गोळीस बळी पडावे लागले. अशा कृत्याना तशाच प्रकारे उत्तर द्यावयास पाहिजे याची जाणीव भूमिगताना झाली.  हत्त्यारे मिळविणे म्हणजे जीवाशी खेळ होता. पोलीस
ठाण्यावर हल्ला करून बंदुकीने उत्तर देऊन त्यानी काही हत्यारे मिळविली पण ती किती पुरेशी पडणार ? शेवटी त्यानी मुत्सद्देगिरीने हत्यारे मिळविण्याचे ठरविले.  
    सातारा जिल्हा शूर लढवय्ये सैनिकांचा जिल्हा आहे ह्या जिल्ह्यात अनेक लोकांना बंदुकीचे परवाने आहेत,  तसेच पेन्शनर सैनिकांकडेही हत्त्यारे मिळू शकतील ही भूमिगतांना जाणीव होती. म्हणून भूमिगतांनी अशा लोकांकडे संधान बांधले.  क्रांतीचे महत्त्व पटवून दिले व या स्वातंत्र्यसंग्रामात आपणही हातभार लावावा अशी विनंती केली.  
       त्याचा परिणाम योग्य तोच झाला.  काही परवानधारकानी स्वखुषीने हत्त्यारे भूमिगतांच्या स्वाधीन केली व उलट सरकारकडे बहाणा केला की आमची हत्यारे भूमिगतांनी आम्हाला मारहाण करून काढून नेलेली आहेत.  यामुळे आपोआपच त्यांच्यामागचा सरकारचा ससेमिरा कमी झाला पण अशा मार्गाने मिळविलेल्या बंदुकांची संख्या फार कमी होती. 
        तसेच इंग्रजांच्या हस्तकांजवळ असलेली हत्यारे भूमिगतांना सहजासहजी मिळाली नाहीत.  त्यासाठी भूमिगताना त्यांवर सक्ती करावी लागली. तसेच भूमिगतांना स्वसंरक्षणाच्या दृष्टीने अधिक हत्यारे मिळविण्यासाठी गोव्याहून काही हत्यारे आयात करण्यात आली.  गोव्याहून हत्यारे आणण्याचे कार्य बॅ. जी. डी. पाटील व वसंतरावदादा यांचेवर सोपविण्यात आले होते. ते तीन वेळा गोव्यात गेले व नामदार बांदोडकरांसारख्या अनेक धनिक लोकांचे साहाय्य घेऊन त्यांनी ही कामगिरी उत्तम रीतीने पार पाडली.

 हत्यारे व दारूगोळा मिळवण्यासाठी अपार कष्ट हत्यारे मिळविल्याने भूमिगतांचा प्रश्न सुटणार नव्हता.  भूमिगतांना पोलीस तसेच दरोडेखोरांबरोबर सामना देत असताना अनेक वेळा गोळीबार करावा लागत होता.  
       म्हणून त्याना दारूगोळयाचा पुरवठा करणे हे अत्यंत महत्त्वाचे व अवघड काम करावे लागत होते व ही जबाबदारी आबा यांचे कडे होती.  आबांनी सुरूवातीस शिरूभाऊ लिमये यांचेमार्फत मिलिटरीचा काही दारूगोळा मिळविला पण भूमिगतांचे स्वसंरक्षणासाठी दारूगोळयाची आत्यंतिक जरूरी असल्याने दारूगोळयाचे शोधासाठी आबांना अन्य मार्ग
शोधावे लागले,  मुंबईतील एका दारूगोळा व बंदुकाविक्री करणाऱ्या दुकाना तील विक्रेत्याच्या नोकराकडे त्यानी संधान बांधिले.  ' चळवळीसाठी तू मदत करीत आहेस म्हणजे स्वातंत्र्यासाठी तू झटत आहेस, तुझे श्रम कारणी लागत आहेत ' असे विचार त्याचे मनावर बिंबविले. 
       कर्मधर्मसंयोगाने तो सातारा जिल्ह्यातील बिळाशी भागातील रहिवाशी निघाला.  त्याने केलेली मदत बहुमोलाची ठरली. त्यावेळी आबांचा मुक्काम मुंबईत होता.  अगोदर ठरलेल्या दिवशी संध्याकाळी बरोबर सहा वाजता प्रिन्सेस स्ट्रीटच्या नाक्या वर ते या बहादूराची वाट पहात असत.  आणि हा मनष्यसुद्धा कापडाच्या साध्या पिशवीत छोटी बॅग घालन त्यात काडतुसे घालन आणीत असे अशा प्रकारे त्या विक्रेत्याच्या नोकराने खूप मोठ्या प्रमाणात काडतुसांचा पुरवठा केला. 
         पण एकाच प्रकारच्या बंदुका भूमिगतांचे जवळ नव्हत्या,  त्यामुळे त्या बंदुकांना लागणारी सर्व प्रकारची काडतुसे मुंबईत मिळाली नाहीत.  १२ बोअरच्या राइफल्सना लागणारी काडतुसे मुंबईत बरीच मिळाली.  
     त्या काडतुसांच्या शोधात असताना आबांना त्यांचे मित्र हरीभाऊ धुमाळ भेटले व त्यांचेबरोबर सहज गप्पागोष्टी करीत असताना त्यांच्या एका नगर जिल्ह्यातील पाहुण्यांची श्री.  धुमाळ यांना आठवण झाली. ते पाहुणे लष्करात कर्नलच्या हुद्यावर काम करणारे श्री. अमृतराव मोहिते होत. त्यांच्या सर्व कुटुंबियांशी आबांची चांगली ओळख होती. आबांचे डोक्यात विचारचक्र सुरू झाले.  कोणतीही एखादी जबाबदारी स्वीकारल्यानंतर कितीही संकटे आली तरी मागे हटायचे नाही व चिकाटीने प्रयत्न करीत रहाण्याचा हा आबांचा बाणाच होता. 
         या स्वभावानुसार आबा नगर जिल्ह्यामध्ये गेले.  कर्नलसाहेब नोकरीवर होते व घरी फक्त त्यांची पत्नी होती.  आबांना पाहिल्यानंतर त्या साध्वीने आपल्या खानदानी घराण्याला शोभेल असे उचित स्वागत केले व काडतुसे देऊन त्यांची बोळवण केली.  अनपेक्षित यश मिळाल्याने आबा खुशीत होते व याच आनंदात ते रेल्वेतून भायखळा स्टेशनवर उतरले. पुढे निराळेच संकट वाढून ठेवलेले त्यांना दिसले.  हातात काडतुसानी भरलेली पिशवी घेऊन ते प्लॅटफार्मवर उतरतात तोच एका पोलिसाने त्यांना हटकले व आबांना म्हणाला ' थैली खोलो ' ' थैली मे क्या है ? ' हे ऐकताच आबांच्यापुढे प्रश्नचिन्ह उभे राहिले पोलीसांच्या गोळ्या छातीवर झेलणाऱ्या आबांचे छातीत या बोलण्याने धस्स झाले.  पण का ? त्यांच्या घाबरण्याचे कारण निराळे होते. 
        त्यांच्या नजरेसमोर कर्नल मोहित्यांची पत्नी उभी राहिली.  ज्या साध्वी स्त्रीने देशभक्तीने प्रेरित होऊन आवाना ही बहुमोलाची मदत केली होती ती करताना तिने आपल्या नवऱ्याच्या नोकरीचा विचार केला नव्हता.  अशा खानदानी घराण्यातील देवतेस पोलिसांचा पाहुणचार मिळणार की काय अशी त्यांना धास्ती पडली. आबाना स्वतःची चिता नव्हती देशासाठी आत्म बलिदान करावयास निघालेल्या भूमिगतांचे ते नेते होते.  
         मग त्यांना पोलिसांची भीती काय वाटणार ? पण अशा प्रसंगीही आबांनी न डगमगता पोलीसाला दिली हुलकावणी.  आवा पोलिसाला म्हणाले, ' मला वाटलेच, पण तुमचा दोष नाही, तुम्ही चोर सोडून संन्याशालाच फाशी देणार,  गुंड दररोज वाटेल तेवढा माल नेत आहेत व आणत आहेत, त्यांना मात्र हा त्रास नाही. त्रास मात्र आमच्यासारख्या लोकांना,  ही पहा पिशवी, असे म्हणून बाबानी ती पिशवी त्या पोलिसांपुढे धरली, आणि पहा काय पाहावयाचे ते पहा. असे म्हणून पिशवीतील काडतुसांच्यावर ठेवलेली मफलर व दाढीच्या सामानाची छोटी बॉक्स पोलिसांना दाखविली.  हे सामान पाहून, चला जावा म्हणून त्याने तोंड फिरवले व आबांना जाण्याची परवानगी दिली.

No comments:

Post a comment