Tuesday, 5 May 2020

मोठे पणाचा वीट ! (Bored of dignity)

मोठे पणाचा वीट ! ( Bored of dignity)

मोठे पणाचा वीट ! (Bored of dignity)

 या जगातील बहुतेक गोष्टी अशा आहेत की,  काही काळ-पर्यंतच्या उपभोगानंतर त्यांचा बीट येतो.  एकदा अशी वेळ असते की, अमुक अमुक वस्तु आपल्याला केव्हां मिळेल असें होऊन जाते,  परंतु काही काळाच्या अनुभवाने मनाच्या वासनेचा शांतता झाल्यानंतर आता आपण यांतून कसे सुटू अशाबद्दलची विवेचना मनुष्याचा मनाला लागते.  या मृत्युलोकांतील उपभोग्य वस्तु देवाने अशा चमत्कारिक करून ठेविल्या आहेत की, उपभोगाने त्यांचा वीट येतोच. साखर पुष्कळ खाल्ली म्हणजे साखरेचा विट येतो,  किंवा काही तीच तीच पक्वांन्ने पुष्कळ वेळा खाल्ली झणजे त्यांचा वीट येतो, हे सामान्य अनुभव पुष्कळांना आहेत. परंतु मोठेपणा, नावलौकिक, राज्य-सुख, सागरात पृथ्वी आणि गजांतलक्ष्मी यांची प्राप्ति,  या गोष्टी अशा आहेत का, त्या फारच थोड्या लोकांच्या आटोक्यात असल्यामुळे पुष्कळांना
   याबद्दल काहीच कल्पना नसते ! परतु उपभोगाने यादी गोष्टीचा वीट येतो.  असल्या मोठ्या उदात्त कल्पनांचाही वीट आल्याची उदाहरणे मोठ्या लोकांच्या चरित्रांतून आढळावयाची.  
       मोत्यांचे शिंपले झाले तरी जेथे मोती पिकत असतील तेथेच ते सपडावयाचे.  दाण्याच्या राशींत त्यांचा अवगत कोठून होणार ! परंतु असे प्रसंग जेव्हां आपल्या दृष्टत्पत्तीस येत त,  जेव्हां मोठेपणाच्या शिखरावरील माणसांना त्याच्या मोठे पणाचा कंटाळा आलेला आपण पाहतो, तेव्हा आपले अंतःकरण सद्गदित होतं,  गानें शिथिल पडतात, चित्त उद्विग्नता धारण करते, आणि नेत्रप्रांतांमध्ये ईषदश्रुबिंदु प्रादुर्भूत होतात ! महत्त्वाकांक्षेच्या हिमालयपर्वतावर अर्वाचीन इतिहासामध्ये नेपोलियन बोनापार्ट इतका उंच कोणीही चढला नसेल.  
     त्याच्या चरित्रांतील एकप्रसिद्ध प्रसंग मोठेपणा-च्या कंटाळ्याचा दृष्टीने अतिशय हृदयद्रावक आहे.  रशिया मध्ये फ्रेंच सैन्य घेऊन नेपोलियन लढत असतां त्याच्या यशश्चंद्राच्या वद्य पक्षाला थोडी थोडी मुरवात झाली होती.  मोठेपणा-च्या महापर्वतावरून ता हळुहळु खाली उतरू लागला होता. आणि असे हे होणारच ! एकट्या मनुष्याचा उत्साह आणखी किती दिवस टिकणार ? दहा बारा वर्षे त्या एकट्याण्याने जितक्या लढाया मारल्या असतील आणि जितको राज्ये उलथी पालथी केली असतील,  त्याच्या निम्मेनेसुद्धा महत्कृत्य या रेम्याडोक्या आत्मश्लाघी इंग्लिशांच्या हातून सबंध दोन शतकाच्या विस्तीर्ण अवधी मध्येही झाली नसतील. इतक्या परा-क्रमाने नंतर पराक्रम करण्याचाही क्षणभर कंटाळा आला, तर त्यांत कांही आश्चर्य
 नाही.  

मोठे पणाचा वीट ! ( Bored of dignity) भाग २


     कारण,  मनुष्य म्हणजे काही अखंड शक्तींचा परमेश्वर नव्हे.  रशिया-वरील मोहिमेत एके वेळा एका टेकडीवर रात्रीचा छापा घालण्याचा प्रसंग आला होता.  ज्या फ्रेंच टोळीला त्या टेकडी वरील माणसे कापून काढून ती हस्तगत करून घेण्याचा हुकूम होता,  तिने आपली कामगिरी चोख बजावली. या टोळीबरोबर त्या प्रसंगी नेपालियनही होताच. टेकडीवर रशियन शिपाई झोपी गेलेले होते,  यांच्यावर अचानक छापा घालण्यात आला, व ते सगळे झोपेत असतां कापले गेले. पण फ्रेंच लष्करां तील एका शिपायाला हे कृत्य आवडले नाही.  झोपेत एखाद्याने कापून काढणे हे शिपायाचें काम नसून खून करणारांचे कृत्य होय, असें त्याला वाटले. व शिपाई आणि खून करणारा मनुष्य यांच्यामध्ये काही फरक नाही,  अशी त्याची खात्री होऊन त्याला आपल्या धंद्याचा अगदी वीट आला.  
     ती ऐन रात्रीची वेळ होती.  काळोख मिट्ट पडला होता बारीक बारीक पाऊसही पडतच होता.  आणि जिकडे तिकडे चिखल झाला होता. अशा स्थितीत सदर शिपाई एका झाडा-जवळ थकून बसला असता त्याच्या तोंडून असे उदार निघाले की,  “ मला आतां या लढाईच्या कामाचा वीट आला ! " “ मलाही पण तसाच वीट आला आहे ! ". जवळच काळोखांतून दुसरा एक आवाज निघाला ; हा दुसरा आवाज त्या पहिल्या शिपायाला ओळखीचासा वाटला.  पण त कोण हे त्या नक्की कळेना. म्हणून त्याने जरा जास्त प्रयत्नाने निरखुन पाहिलें, तेव्हां त्याच्या सगळे लक्षात आले. त्या झाडा-जवळ एकटाच कोणी एक मनुष्य उभा होता. त्याची मुद्रा खिन्न झालेली होती.  घोडा वगैरे काहीएक त्याच्याजवळ नव्हते. त्याचे पाय चिखलाने लडबडलेले होते.  
        अंगांतील कपडे फाटून गेलेले होते.  आणि त्याच्या डोकीवरील टोपाच्या काठावरून पावसाचे पाणी खाली ठिपकत होते.  अशा स्थितीत तो मनुष्य होता. त्याला त्या शिपायाने ओळखलें. बादशाही वैभवाचा | एक लेशही त्या वेळी त्याच्याजवळ नव्हता.  इतर दहा शिपायांप्रमाणेच नेपोलियन हा त्या वेळी एक अकरावा शिपाई, अशा स्थितीत होता. ' तुला बढती मिळत नाही ह्मणून का तूं या लढाईच्या धंद्याला कंटाळला आहेस ? " असें नेपोलियननें त्याला विचारले.  “ नाही, मला बढतीही नको ! " असे त्या शिपायाने उत्तर दिले.  
       हे संभाषण चालले आहे इतक्यांत आपल्या काही शिपायांवर फ्रेंच लोकांनी छापा घातला,  ही बातमी शेजारच्या टेकड्यांवरील रशियन ऑफिसरांना कळून त्याठिकाणांवरून या फ्रेंच सोन्यावर तोफांचे मारा सुरू झाला आणि त्यांपैकी तोफेचा एक गोळा नेपोलियनच्यापुढे अगदी जवळ येऊन पडला.  तो गोळा येऊन पडल्या-मुळे जवळच जी पलटण होती ती घाबरून आणि दचकून मागें सरली. परंतु नेपोलियन मात्र त्या गोळ्या जवळ मुद्दाम गेला. तो गोळा आगीने लाल भडक झालेला होता, व त्यातून धूर बाहेर पडत होता.  नेपोलियन अतिशय उत्सुकतेने जवळ उभा राहिला ! कांही वेळ जिकडे तिकडे अगदी शांतता होती. आणि मग थोड्याच अवकाशात तो गोळा फुटला. नेपोलियन मोठ्या आशेने होता ! पण त्या गोळ्याने कोणालाही काही दुखापत झाली नाही.  दुर्दैवी नेपोलियन ! त्या गोळ्याने त्याचा अंत झाला असता तर कांहों वाईट नव्हते. दुर्दैवाचा राहुयाला हळूहळू ग्रासू लागला होता. त्याचे सैन्य लढायला अगदी कंटाळले होते. आणि त्याचे शिपाई एकेक गळत चालले होते.  
      अशा स्थितीत पुढील दुःखें सहन करण्याकरिता जिवंत राहण्यापेक्षा त्या गोळ्याने नेपोलियनचें शरीर हवेत उडवून दिले असते,  तर काहीं वाईट नव्हते. हेलिना बेटांतील तुरुंगापेक्षा - हीम्सजवळील त्या टेकडी वरचे मोकळे वातावरण त्या स्वतंत्रता-प्रिय प्राण्याला खात्रीने जास्त झाले असते ! लढ्यांचा,  मोठे पणाचा आणि राज्यकारभारांचा नेपोलियनला अगदी वीट आला होता. व हा गोळा तरी मला व या यातनेंतून सोडवील काय, असें ह्मणून मोठ्या आशेने त्या गोळ्या-जवळ जाऊन नेपोलियन उभा राहिला होता,  त्यावेळची त्याच्या मनाची स्थिति काय असेल ! पण नाहीं ! देव अनुकूल नसेल, तर मरण सुद्धा घ्यावयाचे नाही ! यूरोप खंडातील दहा-पांच रेमेडोके एकत्र जमून आणि इंग्लिश लोक हे त्यांतील दुवाचार्य बनून त्यांनी त्या एकट्या वाघाला कोंडले,  हे शतकृत्य केल्याचा क्षुद्र लौकिक वेलिंग्टन साहेबांना मिळावयाचा होता, ह्मणून त्या गोळ्याने नेपोलियनला मारिलें नाहीं काय ? पण असे असेल तर देवाच्या घरी हा केवढा अंधार ! 
असो,  नेपोलियनला त्याचा मोठेपणा जड झाला होता,  पण त्यांतून त्याची सुटका होईना.  
      जीव द्यावा आणि या मोठेपणांतून आपली सुटका करून घ्यावी,  इतका नेपोलियनला आपल्या मोठे-पणाचा वीट आला होता. पण परमेश्वर त्याला त्यातून सोडवेना.  अशा प्रसंगी काय करावयाचे ! त्या जड झालेल्या मोठेपणांत कष्टाने दिवस
काढले पाहिजेत ! नेपोलियनसारखे महात्मे जेव्हां आपल्या मोठेपणाला कंटाळता,  तेव्हां त्यांचा पाडाव करण्याची मशकादिकांला संधि-मिळते, व त्यांनी चघळून चघळून टाकून दिलेल्या उच्छिष्टावर या जगांतील दरिद्री प्राणी पुष्ट होण्याची धडपड करतात,  असे हे जग विचित्र आहे. या जगांत सर्व गोष्टींचा मनुध्याला वीट येतो. ज्याचा वीट येत नाही अशी फक्त एकच गोष्ट आहे. आणि ती पर परमेश्वराचे ध्यान ही होय !. 

No comments:

Post a comment