Tuesday, 5 May 2020

Establishment Of Anti-government And Lock-in Movement (चले जाव चळवळ)

प्रतिसरकाराची स्थापना आणि ' चले जाव ' चळवळीचा ताळेबंद
      या लेखामध्ये तुम्ही शिका प्रतिसरकाराची स्थापना आणि ' चले जाव ' चळवळीचा ताळेबंद.

Establishment Of Anti-government And Lock-in Movement (चले जाव चळवळ)
प्रतिसरकाराची स्थापना

प्रतिसरकाराची स्थापना 
मिदनापूर,  बालीया, सातारा इ.  ठिकाणी जनतेने प्रतिसरकारे स्थापन केली 
( १ ) मिदनापूर ( बंगाल ) येथील प्रतिसरकार - १७ डिसेंबर १९४२ ते ८ ऑगस्ट १९४४ पर्यंत तामलुक विभागात प्रतिसरकार म्हणून कार्य करीत होते.  म. गांधीच्या विनंतीवरून प्रतिसरकार रद्द करण्यात आले प्रतिसरकारमध्ये एक हकमशहा, काही मंत्री, न्यायाधीश, पोलीस दल गुप्तहेर, शुश्रूषा पथक यांचा समावेश असून शांतता,  सुव्यवस्था, न्याय दान इ. स्वरुपाची कामे प्रतिसरकारकडून केली जात. याशिवाय गोरगरीब व असहाय्य लोकांना मदत केली जाई. मिदनापूर प्रतिसरकारने १. ४ तारघरे व पोस्ट ऑफिसे मोडली.  २७ मैल लांबीच्या टेलीफोन तारा तोडल्या चार पोलीस ठाण्यावर हल्ले चढविले.  
( २ ) बालीआ उत्तरप्रदेश ) येथील प्रतिसरकार - १८ ऑगस्ट १९४२ च्या रात्री बालीआतील लोकांनी हरताळ पाडला,  मिरवणुका काढल्या, तारा तोडल्या, पूल उडविले, रूळ उखडले व प्रांतिक सरकारशी जिल्ह्याचा संबंध तोडल्यावर कलेक्टर कचेरी व ट्रेझरीचा ताबा घेण्यासाठी निघाले.  ताबा घ्यावयास येणाऱ्या हिंसक जमावास अडविण्यासाठी तुरुंगातील चितु पांडे व इतर १०० काँग्रेस कार्यकर्त्यांना मुक्त केले. मुक्त झालेल्या कार्यकर्त्यांनी बालीआ मुक्त झाल्याची घोषणा केली ( २० ऑगस्ट ) व सरकारी अधिकान्यांना कैद करून ट्रेझरीचा व शस्त्रागाराचा ताबा घेतला पण दोन दिवसांनी लष्कराने रात्री शहरात प्रवेश करून ब्रिटिश राज्य प्रस्थापित केले.  
( २३ ऑगस्ट ) व मारझोड गोळीबार,  जाळपोळ, बलात्कार, लुटालूट इ. गोष्टींचा घुमा कूळ घातला.  भागलपूर ( बिहार ) 
येथेही प्रतिसरकार स्थापण्याचा प्रयत्न झाला पण तो अल्पकालीन ठरला.  
( ३ ) सातारा प्रतिसरकार - चले जाव आंदोलन सुरू झाल्यावर जनतेने ठिकठिकाणी सभा,  मिरवणुका, मोर्चे काढले. पैकी वडूज व इस्लामपूर येथील मोर्ध्यावर गोळीबार झाला.  कार्यकर्ते भूमिगत कार्यकर्त्यांनी राज्ययंत्रणा बंद पाडण्यासाठी जाळपोळ केली. 
      सरकारी इमारतीची नासधूस केली,  बाईचे न्यायालय जाळले, तीन मालगाड्या पाडल्या,  शिरवडे व चरण येथील पोलिसांच्या बंदुका लांबविल्या काही भूमिगत कार्यकत्यांना केवळ राज्ययंत्रणा बंद पाडणे पसंत पडले नाही.  तर बंद पडलेल्या राज्ययंत्रणेची जागा घेण्यासाठी प्रतिसरकार स्थापन करण्याचा प्रयत्न केला ( नोव्हें. १९४४ ).  
      प्रतिसरकार स्थापन करून सातारा जिल्ह्यात ग्रामराज्याची स्थापना केली.  प्रतिसरकारची घटना बनविण्यासाठी १०५ भूमिगत कार्यकर्त्यांनी करंजखोप तीन आठवडे तळ ठोकला ( १९४५ ).  तथापि कार्यकर्त्यांनी ब्रिटिश सरकारला दाद दिली नाही. पोलिसांनाच फितूर करून सातारा पोलीस हेडक्वार्टरमधून त्यांनी तीन बंदुका लांबविल्या ; शेगोलीच्या रानात रेल्वेगाडी लुटली.  प्रति सरकारमधील कार्यकर्त्यांनी चिमठाणा ( धुळे जिल्हा ) येथे ५ । । लाखांचा खजिना लटला. 
       यास खानदेशातील शंकर माळी,  व्यंकटराव घोबी, डॉ. उत्तमराव पाटील व सातारा जिल्ह्यातील किसनमास्तर,  नागनाथ नाईकवडी आप्पा पाटील इ. कार्यकर्त्यांचे धैर्य कारणीभूत होते. भूमिगत कार्यकर्त्यांवर तलवारीचा वार करणान्या व पोलिसांना माहिती पुरविणा - या देऊरच्या पोलीस पाटलाचा त्यांनी खून केला.  प्रतिसरकारच्या अध्यक्षस्थानी किसन वीर तर बाबूराव घोरपडे हे प्रमुख न्यायाधीश होते.  
        डी.  जी देशपांड्यांनी ' बहिरजी नाईका ' ची भूमिका उत्तम बजावली.  सराईत दरोडेखोरांनी भूमिगत कार्यकर्त्यांच्या नावाने अनेक दरोडे पाडले व खून केले तेव्हा दरोडेखोरांपासून समाजाला होणारा त्रास नष्ट करण्यासाठी व समाजात शांतता - सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी दरोडेखोरांचा बंदोबस्त केला.  पोलिसांना माहिती पुरविणारे व समाजविरोधी कृत्ये करणारे यांच्या तळपायावर छडी मारून शासन केले जाई. ह्या तळपायावर छडी मारून शासन करण्याच्या पद्धतीस पत्री मारणे असे म्हणत. म्हणून पत्री मारणा - या प्रतिसरकारला पत्री सरकार ' असे नाव पडले.  प्रतिसरकारने गावोगावी न्यायालये भरवून झटपट व मोफत न्याय दिला. ग्रामीण भागातील हंडा पद्धत, लग्नातील वाजंत्री, जेवणावळीचा आवाक्याबाहेरचा खर्च याला आवर घालण्याचा प्रयत्न केला व विधायक कार्यास हातभार
गेलेल्या जमिनी योग्य नुकसानभरपाई देऊन परत करावयास लावल्या.
      आंदोलनातील व प्रतिसरकारमधील क्रांतिसिंह नाना पाटील,  किसनवीर बाबराव घोरपडे, कासेगांवकर वैद्य, उत्तमराव पाटील व पांडू मास्तर कचरे इ.  भूमिगत कार्यकर्त्यांचे कार्य पाहून म. गांधी, पं. जवाहरलाल नेहरू, अशोक मेहता यांसारख्या श्रेष्ठ देशभक्तांनी कार्य कर्त्यांची प्रशंसा केली.  १९४६ च्या सुरवातीस घटनात्मक ताळेबंदी नष्ट होऊन काँग्रेसने मुंबईस प्रांतिक मंत्रीमंडळ बनविल्यावर भूमिगत कार्य कर्त्यांनी प्रतिसरकार रद्द केले ( मे १९४६ ) प्रतिसरकारमधील कार्यकत्यावर खटला भरावा असा सरकारचा विचार होता व त्यासाठी भारतमंत्र्याची परवानगी मागितली परंतु डिसें.  १९४५ त झालेल्या आझाद हिंद फौजेच्या खटल्याप्रमाणे हा खटला चालेल व त्याचा देशात मोठा मवगवा होऊन राष्ट्रीय भावना आणखी प्रखर होतील व अशांतता माजेल म्हणून खटला चालविण्यास भारतमंत्र्याने परवानगी नाकारली. 
          अरुणा असफअली,  राममनोहर लोहिया,  अच्युत पटवर्धन, जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय कार्यकत्यांनी भूमिगत होऊन प्रतिकार केला.  त्यांचे कार्य पाहून पं. जवाहरलाल नेहरू म्हणतात, ' बेचाळीसच्या या क्रांतिकारकांनी जे केले ते कदाचित मीही त्या स्थितीत केले असते.  या संग्रामात अरुणादेवींची कामगिरी फार उज्ज्वल आहे. 
        सातारा,  मिदनापूर,  बिहार, बंगाल व उत्तर प्रदेश यातील घटना हिंदी जनतेच्या स्वातंत्र्याच्या इतिहासातील वैभवाची प्रकरणे ठरतील.  ' जयप्रकाश यांनी हजारीबागच्या सेंट्रल जेलमधून इतर पाच जणांसह ९ नोव्हेंबर १९४२ रोजी पलायन केले. भूमिगत राहून ' स्वातंत्र्य लढयात भाग घेणाऱ्या सर्व सैनिकांसाठी ' नावाचे पुस्तक कोठून तरी प्रसिद्ध केले व सशस्त्र क्रांतीचा पुरस्कार केला.  दिल्ली, मुंबई, मद्रास, कलकत्ता शहरात भूमिगत राहून संघटना केली नेपाळमध्ये जाऊन, ब्रिटिश सरकार विस्कळीत करण्यासाठी गनिमी लढयाच शिक्षण दिलेल्या टोळ्या ' आझाद दस्ता ' तयार केल्या. मे १९४३ त ते पकडले गेले व त्यांना हनुमाननगर जेलमध्ये ठेवण्यात आले तेव्हा ५० सहान क्रांतिकारकांनी जेलवर हल्ला चढवून नारायण व इतर सहा जणांना केले.  कलकत्त्यास भूमिगत राहून त्यांनी सुभाष आझाद हिंद सेनेशी संधान बांधण्याचा प्रयत्न केला. 
        सिंधचे मुख्यमंत्री अल्लाबक्ष आंदोलनास म्हणन आपणास मिळालेल्या मानदर्शक पदवीचा त्याग केला तेव्हा सिंध प्रांताच्या गव्हर्नराने,  अल्लाबक्षच्या पाठीमागे विधीमंडळात बहुमत असूनही, अल्लाबक्षला मुख्यमंत्रीपदावरून दूर केले. ( ऑगस्ट शिकारपूर येथे भर दिवसा अल्लाबक्षचा खून करविण्यात आला सरकारकडून जुलूमी दडपशाहीची कृत्ये होतात याबद्दल बंगालचे मख्यमंत्री डॉ.  शामाप्रसाद मुकर्जी यांनी निषेध व्यक्त केला. सामदायिक दंड बसविताना फक्त हिंदू लोकांकरच बसविला जातो. याबद्दल निषेध व्यक्त करण्यासाठी डॉ. शामाप्रसाद मुकर्जीनी बंगालच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. 

' चले जाव ' चळवळीचा ताळेबंद.

' चले जाव ' चळवळीचा ताळेबंद  २५० रेल्वे स्टेशनांची नासधूस करण्यात आली अथवा नाश करण्यात आला,  ५०० पोस्ट ऑफिसांवर हल्ला चढविण्यात आला, पैकी ५० पोस्ट ऑफिसे जाळण्यात आली,  १५० पोलीस ठाणी व इतर इमारती जाळण्यात आल्या. टेलिफोन व टेलीग्राफच्या तारा ३५०० ठिकाणी तोडण्यात आल्या.  थोडे अधिकारी, काही गोरे शिपाई, ३०पोलीस, ११ लष्करी शिपाई ठार झाले. चोरी चोराप्रमाणेच अष्टी ( म. प्रा.  ) येथे प्रकार घडला. पोलिसांनी गोळीबार केला त्यात पाच जण ठार झाले.  
       तेव्हा जमावाने एक सबइन्स्पेक्टर व चार पोलीसांना ठार केले.  सरकारी नोकरांनी राजीनामा देण्यास व काँग्रेस संघटनेत येण्यास नकार दिला म्हणून जमावाने चिमूर ( म.  प्रा. ) येथे एक पोलीस सर्कल इन्स्पेक्टर, सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट, व तहसील दार यांना ठार केले.  मिनापूर ( मुंझफरपूर, बिहार ) येथे लोकांनी पोलीस ठाण्यावर हल्ला चढवून पोलीस सबइन्स्पेक्टरला जिवंत जाळले. 

सरकारची दडपशाही
 सरकारची दडपशाही नेत्यांच्या धडपडीनंतर ठिकठिकाणी हरताळ,  निषेध सभा, मिरवणुका निदर्शने होऊ लागली. त्यांना तोंड देण्यासाठी सरकारी आज्ञा सुट लागल्या भारत संरक्षण नियमान्वये दुकाने,  उपहारगृहे बंद करण्यास यांच्या बातम्या छापण्यास व प्रसिद्ध करण्यास बंदी घातली. काँग्रेसने पुरस्कारलेल्या सामु दायिक लढयाबद्दल,  लढ्यातील घटनांबद्दल व त्या घटनासंबंधी सरकारने केलेल्या कृत्तीबद्दल छापण्यास बंदी केली.  
       वृत्तपत्रावर सरकारी नियंत्रणे आल्यावर मुंबई शहरातून लोकांना इत्यंभूत बातम्या पुरवू लागला.  काँग्रेसची पत्रके जनतेस वारंवार बातम्या देऊ लागली. / बालीआ, कलकत्ता, चित्तगांव शहरावर विमानातून बाँबफेक करण्यात आली.  बाँबफेकीत ३५० जखमी झाले, ९ ऑगस्ट १९४२ ते ३१ डिसेंबर
१९४२ पर्यंत साठ हजार लोकांना अटक करण्यात आली.  २६ हजार लोकांना कमी अधिक मुदतीच्या शिक्षा देण्यात आल्या.  भारत संरक्षण नियमानुसार १८ हजार लोकांना विनाचौकशी स्थानबद्ध करण्यात आले.  
          पोलिसांकडून अथवा लष्कराकडून ५३८ वेळा गोळीबार करण्यात आला.  पाच ठिकाणी विमानातून मशीनगन्सच्याद्वारा लोकांवर गोळीबार करण्यात आला.  गोळीबारात ९४० ठार झाले व १८३० जखमी झाले. एकूण साठ ठिकाणी लष्कर बोलविण्यात आले.  अष्टी, चिमूर, मिदनापूर, बालीआ या चार ठिकाणी पोलीसाकडून अत्याचाराची कृत्ये झाली.  अश्रूधुर लाठी माराचा सरसि वापर झाला. फटक्यांची शिक्षा देण्याचे प्रसंग ५३८ दा आले. ग्रामीण विभागावर ९० लक्ष रु.  चा सामुदायिक दंड लादण्यात आला. ' सर्व वजन खचून गोरे शिपाई पाठवून चळवळ दडपून टाळण्यात आली. ' ' ब्रिटिश साम्राज्याचे दिवाळे काढण्यासाठी मी पंतप्रधान झालो नाही ' असे पंतप्रधान चचिल यांनी उद्गार काढले. 
       बेचाळीसच्या अत्याचारास काँग्रेस जबाबदार आहे असे सरकारी गटाकडून सांगण्यात आले.  तर त्या अत्याचारास सरकार जबाबदार आहे असे म. गांधीनी सांगितले. लष्कराकडून व पोलिसांकडून झालेल्या अत्या चारांची सरकारने नि : पक्षपातीपणाने चौकशी करावी अशी म.  गांधीनी. सरकारला विनंती केली. सरकारने विनंती नाकारल्याने म. गांधीनी ९ फेब्रुवारी १९४३ पासून २१ दिवसांचे उपोषण सुरू केले. उपोषण कालात म. गांधोंची तब्येत बिघडली असताही सरकारने म.  गांधीना मुक्त करण्याचे नाकारले, म्हणून लो. अणे, सर होमी मोदी, सरकार यांनी ग. ज. च्या कार्यकारी मंडळातील सभासदत्वाचे राजिनामे दिले. 
     १९२१ च्या असहकार चळवळीने लोकांच्या मनातील तुरुंगाची भीती नष्ट केली.  १९३० च्या सविनय कायदेभंग चळवळीत स्वातंत्र्य प्राप्तीसाठी लोकांनी मिळकतीचाही त्याग केला व स्वार्थत्यागाच्या कसोटीतून पार पडले.  १९४२ च्या चले जाव आंदोलनात त्यापेक्षाही अधिक स्वार्थत्याग जनतेने केला. करेंगे या मरेंगे या ध्येयाने प्रेरित होऊन कार्य केले. चळवळीस काही ठिकाणी यश मिळाले पण सर्वसामान्यतः घवघवीत यश मिळाले नाही. 
      १९४२ ची चळवळ दडपली गेली.  चळवळीची संघटना व योजना करण्याच्या अगोदरच नेत्यांना तुरुंगात टाकण्यात आले.  नेतृत्वहीन जनतेने हिंसात्मक कृत्ये करताच सरकारला हिंसात्मक कृत्ये करण्यात सकारण सापडले व चळवळ दडपण्यासाठी पाशवी शक्तीचा वापर केला. 

 ' चले जाव ' चळवळीचे फलित ' 
चले जाव ' आंदोलनात घवघवीत यश मिळाले नसेल पण ह्या आंदोलनामुळे स्वातंत्र्य जवळ आले.  स्वातंत्र्यासाठी सामान्य जनता प्राणार्पण करण्यास तयार आहे. अशा अवस्थेत राष्ट्रीय चळवळ येऊन पोहोचली.  स्वातंत्र्य जर लवकर दिले नाही तर क्रांती अथवा उठाव होण्याची शक्यता आहे. असे ब्रिटिशांना आढळून आले. आपण फार काळ हिंदुस्थान ताब्यात ठेवू शकत नाही.  याची जाणीव राज्यकर्त्यांना झाली. चले आव आंदोलनामुळे भूदल, नौदल व विमानदल या लष्कराच्या तिन्ही शाखातील शिपायात स्वातंत्र्यप्रेमाची भावना वाढीस लागली हे नंतरच्या घटनांवरून दिसून येते. 

No comments:

Post a comment