Tuesday, 5 May 2020

Homerul League (होमरुल चळवळ आणि जातीय चळवळी)

होमरुल लीगचे यशापयश व जातीय चळवळी (Success and ethnic movement of the Homerul League)

Homerul League (होमरुल चळवळ आणि जातीय चळवळी)
होमरूल चळवळ

होमरुल लीग लो.  टिळक मंडाले तुरुंगातून हद्दपारीची शिक्षा भोगून ( १९०८ १९१४ ) आल्यावर त्यांनी ब्रिटिशांच्या युद्ध प्रयत्नास सहाय्य केले.  अनिबेझंट यांनी पण ब्रिटिशांच्या यद्ध प्रयत्नात मदत केली. लो. टिळकांना काँग्रेसमध्ये प्रवेश मिळावा म्हणून अॅनी बेझंटबाईंनी १९१४ पासून प्रयत्न करावयास सुरुवात केली.  
   १९१५ च्या मुंबई काँग्रेसमध्ये जहालांना काँग्रे प्रवेशास परवानगी दिली त्याप्रमाणे काँग्रेस घटना दुरुस्त करून १९१६ च्या लखनौं काँग्रेस अधिवेशनात लो.  टिळकांना काँग्रेस प्रवेश देण्यात आला. याच १९१६ च्या लखनौ काँग्रेसमध्ये काँग्रेस लीग योजना संमत करण्यात आली.  
    इस १९०१ च्या कलकत्ता काँग्रेस अधिवेशनात मि.  स्मेडले यांनी आयरिश होमरूलप्रमाणे इंडियन होमरूल लीग सुरू करावी असा सल्ला हिंदी लोकांना दिला होता.  इंग्लंडमधील होमरूल लीगमध्ये रेडमंड यांचे कार्य पाहून अॅनी बेझंटबाई प्रभावित झाल्या होत्या. १९१४ त इंग्लंडला जाऊन ब्रिटिश पार्लमेंटमध्ये भारतासाठी होमरूल लोग स्थापन करण्याचा प्रयत्न केला पण त्यात यश आले नाही.  
     महायुद्धात भारताकडून ब्रिटिशांना मिळणान्या मदतीच्या बदल्यात भारताला बसाहतीचे स्वराज्य देण्यात यावे असे अॅनी बेझंटबाईनी लंडनमधील जाहीर सभेत प्रतिपादले.  भारतात परत आल्यावर ' न्यू इंडिया ' दैनिक व ' कॉमनविल ' साप्ताहिक वृत्तपत्रे जोरात चालवून होमरूल लीगचा प्रचार केला व सप्टेंबर १९१५ त होमरूल लीगची स्थापना केली.  १९१५ च्या मुंबई अधिवेशनात बेझंटबाईनी होमरूल लीग संबंधी ठराव मांडला. पण क्रमाक्रमाच्या सुधारणांद्वारा वसाहतीचे स्वराज्य ह्या काँग्रेस ध्येयाशी होमरूल लीगचे धोरण सुसंगत नसल्याने काँग्रेसने मान्यता दिली नाही.  काँग्रेस मान्यतेवर अवलंबून न रहाता बेझंटबाईनी होमरूल लीगची संघटना केली.  
    बेझंटबाईकी आंतरराष्ट्रीय ख्याती,  प्रभावी वक्तत्व आणि व्यक्तिमत्व, थिऑसॉफीचे सूत्रधारकत्व यांमुळे अनेक लोक होमरूल लीगमध्ये सामील झाले.  व पं. मोतीलाल नेहरू, चितामणी, सर सपू. बॅ. जिना, सरोजिनी नायडु इ. अनेक नेत्यांना बेझंटबाईंनी आपल्या प्रभावी व्यक्तिमत्वाच्याद्वारे होमरूल लीगमध्ये खेचून घेतले.  काँग्रेसच्या सर्व माजी अध्यक्षांनी त्यांच्या होमरूल लीगला पाठिंबा दिला. मुंबई, अलाहाबाद, कानपूर, वाराणसी, मथुरा, कालीकत, मद्रास इ. ठिकाणी होमरूल लीगच्या शाखा उघडल्या.  

लो.  टिळकांचा सहभाग 


डिसेंबर १९१५ च्या मुंबईच्या प्रांतिक नॅशनॅलिस्ट कॉन्फरन्समध्ये नेमलेल्या १५ जणांच्या समितीने केलेल्या शिफारशी विचारात घेऊन लो.  टिळकांनी एप्रिल १९१६ साली बेळगाव येथे मंबई प्रांत, व - हाड द मध्यप्रदेश एवढ्या प्रांतापुरती मर्यादित होमरूल लीग स्थापन केली. बाप्टिस्टा,  केळकर, खापर्डे, मुंजे, करंदीकर इ. होमरूल लीगच्या कार्य कारिणीत आले. 
     होमरूल लीगचे स्पष्टीकरण करताना लो.  टिळक म्हणाले, होमरूल प्राप्तीचा अर्थ इंग्लिश राज्याचा नाश असे नव्हे.  होमरूल म्हणजे प्रत्येक क्षणी ब प्रत्येक पावलोपावली हिंदी लोकांना अडथळा करणाऱ्या केवळ नोकरशाहीचा नाशच होय.  परराष्ट्रीयसंबंध इंग्लंडला देऊन अंतर्गत राज्यकारभारात हिंदी लोकांना स्वायत्तता असावी.  
      लो.  टिळकांना बेझंटबाईप्रमाणेच होमरूल शब्दाचा वसाहतीचे स्वराज्य हा अर्थ अभिप्रेत होता.  महायुद्धाच्यावेळी ब्रिटिश साम्राज्यावर आलेल्या संकटाच्यावेळी ब्रिटिशांच्या पाठीशी राहिल्याने आपल्या स्वराज्याच्या मागणीस बळकटी येते,  महायुद्धामुळे ब्रिटिशांवर आलेले संकट ही आपली स्वराज्यमागणीची सुसंधी आहे. असे अॅनी बेझंट व लो. टिळक या दोघांना वाटे. १९१६ च्या चले जाव आंदोलन
लखनौ काँग्रेस अधिवेशनानंतर लो.  टिळक व अॅनी बेझंट यांनी अनुक्रमे महाराष्ट्रात व मद्रास प्रांतात काँग्रेस लीग योजनेतील स्वराज्याचे ध्येय लोकप्रिय करण्यासाठी जोराचा प्रचार केला.  ' स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे व तो मी मिळबीनच ' अशी घोषणा लो. टिळकांनी लोकप्रिय बनविली.  


होमरुल लीगच्या चळवळीचा जोर आणि अवकळा

     होमरुल चळवळीमुळे प्रांतिक सरकारला भीती वाटली.  मे १९१६ त न्य इंडिया ' पासन २००० रु. ची ठेव मागितली.  २८ ऑगस्ट १९१६ रोजी ती जप्त केली. परत १०, ००० रु. ठेव मागण्यात आली ती दिली.  बेझंटबाईनी ती मद्रास हायकोर्टात व नंतर प्रिव्ही कौन्सिलकडे अपील केले पण यश मिळाले नाही.  मे १९१६ मध्ये बेळगाव व नगर येथील होमरुल लीग सभेपुढे आक्षेपार्ह भाषण केल्याबद्दल लो. टिळकांपासून प्रत्येकी १०००० रु.  याप्रमाणे २०००० रुपयांचे दोन बॉन्ड चांगल्या वागणुकीबद्दल लिहून मागितले पण मुंबई हायकोर्टाने लो. टिळकासंबंधीची ही आज्ञा रद्द करविली अॅनी बेझंटबाई यांना मुंबई प्रांतात व मध्य प्रांतात प्रवेश करण्यास मनाई केली.  ( जून १९१६ ) पंजाबप्रांतात व दिल्लीत प्रवेश करण्यास बिपिनचंद्र पाल व लोकमान्य टिळक यांना मनाई करण्यात आली. ( फेब्रुवारी १९१७ ) होमरुल लीगच्या सभास हजर राहण्यास मनाई करणारे परिपत्रक शाळा व कॉलेजांकडे पाठविण्यात आले. 
         मद्रास सरकारने बेझंटबाई व त्यांचे सह कारी वाडिया,  अरूंडेल यांना उटकमंड येथे स्थानबद्ध केले. ( जून १९१७ ) देशात सर्वत्र निषेध सभा भरविण्यात येऊन अनेक नेत्यांनी होमरुल लींगचे सभासदत्व मुद्दाम स्वीकारले.  जुलै १९१७ च्या ऑ. ई. काँग्रेस कमिटीने होमरुल लीगच्या कार्याची प्रशंसा केली. ऑगस्ट १९१७ त अॅनी बेझंट बाईची काँग्रेस अध्यक्षपदावर नियुक्ती केली. याचवेळी जुलै,  १९१७ त मेसापोटेमिया प्रश्नावर चेंलिन यांना भारत मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला, मॉन्टेग्यू यांना भारतमंत्री नेमण्यात आले. भारताची युद्धप्रयत्नात मदत मिळविण्यासाठी २० ऑगस्ट १९१७ रोजी मॉन्टेग्यू यांनी इतिहास
प्रसिद्ध घोषणा केली.  
      युद्ध संपेपर्यंत राजकीय चळवळीत हिंसक असदनशीर मार्ग अवलंबणार नाही व भारतमंत्री माँटेग्यूच्या भारताच्या भेटीत शांतता ठेवतील या अटीवर बेझंट व त्यांचे दोन साथीदारांना काँग्रेस अधिवेशना अगोदर मुक्त केले.  १९१७ चे वर्ष होमरुल लीगच्या दृष्टीने सनसनाटीचे. गेले. मग मात्र होमरुल लीगला अवकळा आली. . .  

      होमरुल लीगच्या नाशांची कारणे - 

१ ) अर्जविनंत्या,  शिष्टमंडळे या मार्गाचा धिक्कार करणारे लोक,  टिळक, अॅनी बेझंट, बिपीनचंद्र पाल इ. नी धिक्कारलेल्या नेमस्तांच्या मार्गाचा अवलंब केला.  लो. टिळक व अॅनी बेझंट हे लॉर्ड मॉटेग्यूच्या भारत भेटीत त्यांना दिल्लीस जाऊन भेटले. ( नोव्हें.  १९१७ ) लो. टिळक व बिपीनचंद्र पाल हे होमरुल लीगचे शिष्टमंडळ घेऊन इंग्लंडला गेले. ( सप्टें. १९१८ नोव्हें.  १९१९ ) 

( २ ) एकमेकांना सहाय्य करणारे पुण्याचे व मद्रासचे होमरुल नेते आपापसात भांडू लागले.  बेझंटबाईनी व फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य र. पु. परांजपे यांनी प्रांतिक काँग्रेस अधिवेशनात लो.  टिळकांना विरोध केला. हा विरोध सहन न होऊन लो. टिळकांनी अॅनी बेझंट यांना पूतना म्हणन व प्राचार्य परांजपे यांना शिशुपाल ( मुले सांभाळणारा ) म्हणून संबोधून त्यांची अवहेलना केली.  चिडखोर प्रवृत्तीमुळे आपापसात सहकार्य मिळू शकले नाही.  

( ३ ) ब्राह्मणे तरांचा विरोध : - होमरूल लीग चळवळ म्हणजे ब्राह्मणांची चळवळ अशी समजूत महाराष्ट्रात झाली.  होमरुल ( स्वराज्य ) म्हणजे ब्राह्मणांचे वर्चस्व असलेल्या प्राचीन समाजव्यवस्थेचे पुनर्जीवन अशी मद्रासमध्ये समजूत झाली.  होमरूल लीगच्या चळवळीस यश येऊन स्वराज्य मिळाल्यास त्यात ब्राह्मणांचे राज्य येईल अशी कल्पना महाराष्ट्र - मद्रासमधील ब्राह्मणेतरांची होती.  होमरूल लीगला प्रतिशह देण्यासाठी ब्रिटिश सरकारने या ब्राह्मणेत रांच्या कल्पनेस उत्तेजनच दिले. होमरूल लीगला असणारा विरोध इंग्लंड मधील जनतेच्या कानी घालावा म्हणून मद्रासमधील जस्टीस पार्टीचे ( ब्राह्मणेतरांचा पक्ष ) डॉ.  नायर व महाराष्ट्र कर्नाटकातील ब्राह्मणेतरांतर्फे ( सत्यशोधक ) श्री. जाधव यांनी इंग्लंडला प्रयाण केले. 

 ( ४ ) प्रांतिक काँग्रेस अधिवेशनात प्रथेनुसार शेतकऱ्यांना विनामूल्य प्रवेश देण्याचे नाकारले चले जाव आंदोलन
म्हणून नेमस्तांनी ब्राह्मणेतरांशी गट्टी जमवलो व लो.  टिळकांना विरोध केला. धार्मिक राष्ट्रवादाच्या पुरस्कारामुळे लो.  टिळकांना आपल्या आयु प्यात प्रथम मस्लीम. नंतर नेमस्त व नंतर ब्राह्मणेतर यांचा विरोध सहन करावा लागला.  

( ५ ) होमरुल लीगच्या चळवळीत नाविन्य असे काहीच नव्हते.  होमरुल लीगकडून केली जाणारी स्वराज्याची ( वसाहतीचे स्वराज्य ) मागणी ही १९०५ नंतरच्या काँग्रेसच्या ध्येयापासून वेगळी नव्हती.  होमरूल लीगचे नेतृत्व नंतर नेमस्त बनले व शिष्टमंडळे पाठविण्या सारख्या कार्यक्रमाचा पाठपुरावा होऊ लागला. देशात जेव्हा जहाल असहकाराचा कार्यक्रम आखला जात होता अशावेळी होमरुल लीगने असह काराच्या कार्यक्रमास सहकार्य केले नाही.  निवडणुकांवर व विधीमंडळावर बहिष्कार न घालता प्रतियोगी सहकाराचा अवलंब करून निवडणुका लढविण्यासाठी काँग्रेस डेमॉक्रेटिक पक्षाची स्थापना केली. माँटफर्ड सुधारणा कायदा राबविण्यासाठी काँग्रेसमधन बाहेर पडलेल्या नॅशनल लिबरल फेडरेशनमध्ये होमरुल लीगचे कार्यकर्ते ( खापर्डे,  केळकर, बिपीनचंद्र पाल, अॅनी बेझंट इ. ) नंतर सामील झाले.  

(६ ) काँग्रेसमध्ये होमरुल लीग स्थापन केल्यास काँग्रेस पक्षाचा जोम कमी होईल.  स्वराज्याची ( होमरुलची ) मागणी काँग्रेस पक्षामार्फतही होऊ शकते या कारणावरून १९१५ च्या मुंबई काँग्रेसमध्ये होमरुल लीग स्थापन करण्या करण्यासंबंधीच्या अॅनी बेझंटच्या शिफारसीस मान्यता दिली नाही.  काँग्रेस पक्षाचा अधिकृत पाठिंबा न मिळाल्याने सरकारने होमरुल लीगसंबंधी दडपशाहीचे धोरण स्वीकारून सामान्य जनतेस चळवळीपासून परावृत्त केले.  

(७ ) सामान्य होमरुल लीग चळवळ पसरू शकली नाही,  कारण होमरुल लीगपक्षावर सरकारची वक्रदृष्टी होती.  शिवाय होमरुल लीगचे नेतृत्व धार्मिक राष्ट्रवाद्यांकडे होते.  त्यामुळे ब्राह्मणेतरांनी विरोध केला. 

( ८ ) कारखानदार व भांडवलदारांचा मध्यम वर्ग महायुद्धकालीन उद्योगधंद्यात गुंतलेला होता.  सरकारने उद्योगधंद्याना सर्वप्रकारची मदत द्यावयास सुरुवात केली. इजिप्त, पॅलेस्टाईन, पूर्व आफ्रिका यातील आघा डींना लागणारा माल पुरविण्याची कंत्राटे हिंदी कारखानदारांना व व्यापाऱ्यांना दिली.  
    जपानी व अमेरिकन मालाची बरोबरी करू शकतील असा माल निर्माण करण्यासाठी सरकारने संरक्षक जकाती बसविल्या.  हिंदी कापडावर एक्साईज ड्युटी न बसविता ७ - ३० टक्के आयात कापसा वर जकात बसवून हिंदी कापडगिरण्यांना उत्तेजन दिले.  या मध्यमवर्गाकडून होमरुल लीगला सहाय्य मिळाले नाही.  

(९ ) सुधारणाकायद्यास सहाय्य केल्यामुळे होमरुल लीगमधील लढाऊ राष्ट्रवाद नष्ट झाला.  लोकांच्या मनाची पकड घेण्यासारखा कार्यक्रम नंतर होमरुल लीगच्या, अनुयायांनी दिला नाही.  म. गांधींच्या असहकार चळवळीने जनमनावर छाप पडली व लोक तिकडे आकर्षित होऊन होमरुल लीगला विसरले.  अॅनी बेझंट यांच्याऐवजी म. गांधींना ऑल इंडिया होमरुल लीगचे अध्यक्ष बनविण्यात आले. ऑक्टोबर १९२० ला मंबईस होमरुल लीगची बैठक भरली,  तीत होमरुल लीगचे नाव स्वराज्य सभेत बदलण्यात आले. स्वराज्य सभा कालांतराने नकळत काँग्रेसमध्ये विलीन झाली. 

No comments:

Post a comment