Tuesday, 5 May 2020

Indian National Liberal Federation (इंडियन नॅशनल फेडरेशन)

इंडियन नॅशनल लिबरल फेडरेशन (Indian National Liberal Federation)

Indian National Liberal Federation (इंडियन नॅशनल फेडरेशन)

इंडियन नॅशनल लिबरल फेडरेशन


 २० ऑगस्ट १९१७ रोजी माँटेग्यू यानी इतिहास-प्रसिद्ध घोषणा केल्यानंतर १० नोव्हेंबर १९१७ पासून भारताचा दौरा सुरू केला . दौऱ्यात त्यांनी सर भूपेंद्रनाथ बसू , लॉर्ड सत्येंद्रनाथ सिन्हा इ . नेत्यांची भेट घेऊन सुधारणा राबविण्यासाठी प्रागतिकांची स्वतंत्र संघटना निर्माण करण्या विषयी बोलणी केली . 
      त्याप्रमाणे माँटफर्ड अहवाल प्रसिद्ध व्हावयाचे अगोदर कलकत्त्यात नॅशनल लिबरल लीगची स्थापना करण्यात आली व ऑगस्ट १९१८ मध्ये बंगाल प्रांतिक नॅशनल लिबरल लीगचे अधिवेशनही भरले . मुंबईसही प्रागतिकांनी होऊ घातलेल्या सुधारणांस पाठिंबा दिला . 
      नोव्हेंबर १९१८ त मंबईस सर्व प्रागतिकांचे अधिवेशन भरून इडियन नॅशनल लिबरल फेडरेशनची स्थापना झाली . . जुलै १९१८ भारतमंत्री माँटेग्यू व ग . ज . चेम्स्फर्ड यांनी संयुक्त अहवाल प्रसिद्ध केल्यानंतर अहवालासंबंधी मत जाहीर करण्यासाठी मुंबईस काँग्रेसचे खास अधिवेशन बोलावण्यात आले .
       ( ऑ . १९१८ ) त्यात सुधारणा टाकाऊ आहेत असे काँग्रेसने जाहीर केले . मुंबईच्या ह्या खास काँग्रेस अधि वेशनात नेमस्तांनी भाग घेतला नाही . डिसेंबर १९१८ त दिल्लीस काँग्रेसचे नेहमीचे अधिवेशन भरले असता जहालांनी नेमस्तांना नीट वागणूक दिली नाही व नेमस्त गटातील श्रीनिवास शास्त्री ( सहंटस् ऑफ इंडिया सोसा यटीचे सेवक ) यांच्या भाषणात वारंवार अडथळा आणला . त्यामुळे नेमस्तांनी काँग्रेसशी असलेला संबंध तोडून टाकून सुधारणा कायदा राबविण्याचा निश्चय केला महात्मा गांधीनी जालियनवाला हत्याकांड व रौलट कायदा याविरुद्ध जेव्हा असहकाराची चळवळ हाती घेतली यावेळी नेमस्तांनी माँटफर्ड सुधारणानुसार नोव्हेंबर १९२० त घेण्यात आलेल्या निवडणुकात भाग घेतला . - घटनात्मक प्रगतीवर विश्वास होता म्हणून प्रागतिक नेमस्तांनी सुधारणा राबविण्यास सहकार्य केले . सर्वच लोकांनी सुधारणा नाकारल्यास चले जाव आंदोलन
ब्रिटिश सरकार दिलेल्या सुधारणा परत घेईल ब जे पदरात मिळावयाचे तेही मिळणार नाही . 
       असे त्यांना वाटत होते . गांधींचा सत्याग्रह व असह काराचा कार्यक्रम ज्यांना रुचला नाही असे होमरूल लीगचे कार्यकर्ते ( अॅनी बेझंट , बिपीनचंद्र पाल इ . ) काँग्रेसमधून फुटून प्रागतिकांच्या नॅशनल लिबरल फेडरेशनला मिळाले . काँग्रेसने निवडणुका व विधीमंडळ यावर बहिष्कार घातला असल्याकारणाने स्वराज्य पक्षाच्या उदयापर्यंत नॅशनल लिबरल फेडरेशनला निवडणुकात बरेचसे यश मिळाले .

 जातीय चळवळी 

१ ) सत्यशोधक चळवळ व ब्राह्मणब्राह्मणेतर वाद : - समाजातील विषमता नष्ट करावी . ब्राह्मण - भटशाही नष्ट व्हावी , परमेश्वर भक्तीतील मध्यस्थ दूर व्हावा , यासाठी इ स . १८८३ त म . फुल्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली . ही चळवळ १८७२ ते १९१० पर्यंतच्या काळात सामाजिक व धार्मिक स्वरूपाची होती . इ . स . १९१० ते १९३० पर्यंतच्या काळात सत्यशोधक समाजाच्या चळवळीस राजकीय अंशी जातीय स्वरूप प्राप्त झाले व १९१० चे नंतर सत्यशोधक चळवळ , ब्राह्मणेत्तर चळवळ नावाने ओळखली जाऊ लागली .
      ब्राह्मण - ब्राह्मणेतर वादाची कारणे - 

अ ) राजकीय कारणे 

१ ) महाराष्ट्र ब्राह्मणांनी संस्थानिकांना क्षत्रियत्व द्यावयाचे नाकारले . कोल्हापूरचे छ . शाहूराजे क्षत्रिय आहेत , तेव्हा त्याचे संस्कार ब्राह्मणाप्रमाणे वैदिक पद्धतीने केले जावेत . असा शाहू महाराजांचा आग्रह होता तर छ . शाहू महाराज क्षत्रिय नाहीत . म्हणून त्यांचे संस्कार वेदोक्त न केले जाता पुराणोक्त केले जावेत असा निर्णय संकेश्वर पीठाच्या शंकराचार्यांनी दिला व लो . टिळक , प्रो . विजापूरकर यांनी तशीच बाजू मांडली . ह्या वेदोक्त वादामुळे ( इ . स . १९०१ - १९०६ ) ब्राह्मण - ब्राह्मणेतर वादास चालना मिळाली .
 २ ) पेशवाईतील ब्राह्मणाचे वर्चस्व - छ . शिवाजी राजांनी स्थापलेले स्वराज्य ब्राह्मण पेशव्यांनी बळकावले अशी ब्राह्मणेतरांची समजूत होती . ब्राह्मणांना पेशवाईत असे वाटू लागले आता आपणच राजे आहोत . ब्राह्मणांना विशेष सवलती मिळू लागल्या . इतरांना लाग असलेली कायद्याची बंधने त्यांना लागेनाशी झाली . ब्राह्मणांकरिता दक्षिणा व जेवण यांची भरपूर तरतूद ( पेशवे ) सरकारने केली . ( न्या . रानडे ) पूर्वी मानमरातब मिळविणाऱ्या ब्राह्मणेतर सरकारांना ही विषमता पेशवाई काळात जाणवू लागली . तसेच दहशतवादी चळवळीत भाग घेणारेही ब्राह्मण होते . काँग्रेसमधील जहाल राजकारण व महाराष्ट्रातील दहशतवादी चळवळ पेशवाईच्या पुनरुज्जीवनासाठी आहे , अशी ब्राह्मणेतरांची समजूत झाली . 

( ब ) प्रशासकीय कारणे : - 

ब्राह्मण ब्राह्मणेतर याच्या आजच्या भांड णाला महत्त्वाचे कारण म्हणजे सरकारी यंत्रणेत ब्राह्मणांना मिळालेला अन्याय्य वाटा ५ टक्के लोकांनी ९५ टक्के जागा अडविल्या आहेत . अशा स्थितीत दोन्ही जमातीत वैरभाव निर्माण न होईल तरच आश्चर्य ! ( रावबहादूर काळे , सातारा ) सरकारी नोकरीत असलेल्या ब्राह्मणांनी ब्राह्मणेतरांबर जुलूम केले . 
     आजपर्यंत जे सेट मामलेदार झाले त्यापैकी कित्येक आपले काम करीत असता इतके कुनीतीने वागत व गरीबगुरीब लोकांवर जुलूम करीत की त्यांचा एक ग्रंथ होईल . ( म . फुले ) शिरस्तेदार आपल्या वेतनाइतका खर्च करून ही सालात पाच हजार रु . जवळ करतात . सामान्य कारकूनही दहा वर्षे काम करतो तर दोन हजार रुपये जवळ करितो ( लोकहितवादी ) ब्राह्मण कामदार आपणाशी बेमुर्वत खोरपणे वागतो व ख्रिस्ती धर्मोपदेशक काळजीपूर्वक चौकशी करतात , ही परस्परविरोधी दश्य पाहन साहेब परवडला पण ब्राह्मण नको अशी लोकांची वृत्ती झाली , 

 ( क ) शैक्षणिक : -

 इ . स . १८२८ त धाकजी परभू या सनातन्याच्या च्छेखातर मुबई सरकारी मराठी शाळेतून मराठे , कोळी , कुणबी , भंडारी या जातीच्या मुलांना काढून टाकले . इ . स . १८५१ पर्यंत पुण्याच्या पाठ शाळेत फक्त ब्राह्मण विद्यार्थी घेतले जात . या शैक्षणिक विषमतेच्या पोटी सातारच्या प्रतापसिंह ( १८१९ - १८३८ ) भोसल्यांनी ब्राह्मण ब्राह्मणेतर वाद सुरू 
केला . 
      छ . शाहू महाराजांपासून आर्थिक सहाय्य मिळवून पुण्याच्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीने ( १८८४ ) छ . शाहू महाराजांना अध्यक्षपद दिले पण वेदोक्त प्रकरणानंतर महाराजांनी सत्यशोधक चळवळ  पुनरुज्जीवन करताच शाहू महाराजांचे अध्यक्षपद सोसायटीने नामंजूर केले . त्यामुळे ब्राह्मणब्राह्मणेतर वादास अधिकच चालना मिळाली .

 ( ड ) सांस्कृतिक कारणे : -

 द . भारतात मलबार व तामीळ भागात ब्राह्मण ब्राह्मणेतरांचे स्वरूप उग्र झाले . तामीळ भाषेत शैव पंथाचे वाङ्मय विपूल आहे . तसेच तामीळ लेखकांनी तामीळ वाङमय भरभराटीस आणले परंतु तामीळ ब्राह्मण तामीळ भाषेस मान देत नाहीत . त्यांच्या सांस्कृतिक व धार्मिक गोष्टीचे उगमस्थान म्हणून ते संस्कृत भाषेकडे पाहतात व संस्कृत भाषेचे पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न करतात साहजिकच संस्कृत भाषेचे खूळ असलेले ब्राह्मण ब्राह्मणेतरांच्या द्वेषाचे लक्ष्य बनले . 

( इ ) सामाजिक कारणे : - 

मलबारमध्ये संस्थानिकांचे क्षत्रियत्व तेथील ब्राह्मणांनी मान्य केले आहे . त्यामुळे तेथे राजकीय कारण नाही . मलबारमध्ये मातृसत्ताक कुटुंबपद्धती आहे . नायर लोकांतील स्त्री ही मातृप्रधान आहे . तिच्याशी ब्राह्मण संबंध ठेवीत . परंतु नायर पुरुष ब्राह्मण स्त्रीशी संबंध ठेवू शकत नसे . नायर स्त्री व ब्राह्मण पुरुष यात असलेला संबंध हा कायदेशीर वैवाहिक संबंध नाही . हा संबंध कायदेशीर वैवाहिक संबंध मानण्यात यावा अशी मागणी इंग्रजी शिक्षणाच्या प्रभावाखाली आलेल्या नायरांनी ब्राह्मणांकडे केली , पण ब्राह्मणांनी त्यास नकार दिला . म्हणून त्यांनी ब्राह्मणांचा द्वेष सुरू केला . नायरांनी ब्राह्मणेतरांचे नेतृत्व स्वीकारले . मद्रासमधील जस्टीस पार्टीचे नायर , नाडर , मुदलीयार नायडू हे ब्राह्मणेतरांचे नेते होते . 
     महाराष्ट्रात व मद्रास प्रांतात स्वतःस श्रेष्ठ समजत व इतरांना तुच्छतेने वागवीत . ब्राह्मण कितीही लबाड असले व कितीही दुष्ट असले तरी एक गोष्ट निर्विवाद आहे की ज्ञानभंडाराच्या किल्ल्या त्यांच्या कमरेला आहेत . त्यांच्या साह्याशिवाय इतर जातीस ज्ञानाचा लाभ होण्याचा बहुधा मुळीच मार्ग नाही .
( विष्णूशास्त्री चिपळूणकर )
      ब्राह्मणेतरांनी होमरूल लीगला विरोध केला कारण होमरूलचे नेतृत्व ब्राह्मणाकडे होते . होमरूल लीग नेत्यांच्या हाती सत्ता देणे म्हणजे ब्राह्मणाचे हाती सत्ता देणे होय . ब्राह्मणांचे राज्य म्हणजे विषमतेचे , विटाळ - शिवा शिवीचे राज्य सुरू होणे अशी ब्राह्मणेतरांची कल्पना होती .

जस्टिस पार्टीची स्थापना

     ब्राह्मणेतर बहुसंख्य आहेत या सबबीवर माँटफर्ड अहवालाने ब्राह्मणेतरांना स्वतंत्र मतदारसंघ देण्यास किंवा संयुक्त मतदारसंघात काही जागा राखून ठेवण्यास नकार दिला . ब्राह्मणेतर बहुसंख्य असले तरी मताधिकार नसल्याने ब्राह्मणेतर निवडून येण्याची हमी नव्हती म्हणून ब्राह्मणेतरांनी जोराचा विरोध केला व मद्रासमध्ये जस्टिस पार्टीची स्थापना करून चळवळ सुरू केली .
       आपली बाजू मांडण्यासाठी मद्रासमधून डॉ . नायर व महाराष्ट्र - कर्नाटकातून श्री . भास्करराव जाधव इंग्लंडला गेले . त्यांना यश येऊन बहुप्रतिनिधी मतदार संघात ब्राह्मणेतरांसाठी काही जागा राखन ठेवल्या गेल्या . मुंबई विधिमंडळात माँटफर्ड सुधारणांनुसार ब्राह्मणेतरांना सात राखीव जागा मिळाल्या . मद्रास प्रांतात १९२० , १९२३ . व १९२६ च्या निवडणुकांत ब्राह्मणेतरांच्या जस्टिस पार्टीला बहुमत मिळाले व त्यांनी मंत्रीमंडळ बनविले . परंतु महाराष्ट्र तीनही निवडणुकांत ब्राह्मणेतरांचे मंत्रीमंडळ बनवू शकले नाही , कारण मद्रासप्रमाणे महाराष्ट्रात वृत्तपत्रे ब्राह्मणेतरांच्या ताब्यात नव्हती , कर्तृत्ववान पुढारी नव्हते व मुंबई राज्यात त्यावेळी गुजराथ सिंध प्रांताचा पण समावेश होता , त्यामुळे महाराष्ट्रातील ब्राह्मणेतरांचा फारसा प्रभाव पडला नाही . 
         तरीपण १९२० ते १९२५ च्या काळात जेधे मोन्यांनी ब्राह्मणेतर चळवळीची ( सत्यशोधक चळवळीची ) आपली चुणूक दाखविली . 

१९२९ च्या नंतर मात्र ब्राह्मणेतर चळवळ थंडावली . त्याची कारणे

१ ) सत्यशोधक चळवळीचे १९१२ त पुनरुज्जीवन करणारे ब्राह्मणेतरांचे नेते छ . शाहू महाराज १९२२ त वारले .
 २ ) ब्राह्मणे तरांनी नंतर सत्यशोधक चळवळीचे उदात्त स्वरूप विसरून सत्तेच्या पाठीशी लागन व सत्यशोधक चळवळीचे सत्ताशोधक चळवळीत रूपांतर केले .
 ३ ) ब्राह्मणेतर नेत्यांची संकुचित वृत्ती : - ब्राह्मणेतर पुढान्यांनी सर्व ब्राह्मणेतरांना बरोबर घेतले नाही . ब्राह्मणेतर पुढारी अस्पृ श्यांना आपल्याजवळ न करता उलट अस्पृश्यता निवारणास विरोध करीत . सत्यशोधक समाजाची तत्त्वे विसरून जातीयवादी व प्रांतीयवादी दृष्टीने पाहू लागले . शहाण्णव कुळीचे मराठे इतर मराठयांना क्षुद्र लेखीत . याशिवाय चले जाव आंदोलन गुजराथी , मराठी असाही वाद ब्राह्मण ब्राह्मणेतर वादाच्या जोडीला करीत त्यामुळे कर्ते लोक ब्राह्मणेतर चळवळीतून निघून गेले . विठ्ठलराव घाटे सरकारी नोकरीत गेले . 
       जेध्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला व ब्राह्मणेतर चळवळ काँग्रेस पक्षात विलीन झाली . 
४ ) नवे तरुण ब्राह्मणेतर जातीय प्रांतीय दृष्टीने न पाहता राष्ट्रीय दृष्टीने पाहू लागले . पूर्वीचे ब्राह्मणेतर ( सत्यशोधकी ) पुढारी १९४८ ते काँग्रेसमधून फुटले व त्यांनी शेतकरी कामकरी पक्ष स्थापन केला . तरी नवे तरुण पुढारी ( यशवंतराव चव्हाण , बाळासाहेब देसाई
इ . ) राष्ट्रीय दृष्टीने प्रेरित होऊन काँग्रेसमध्ये कार्य करीत राहिले.

No comments:

Post a comment