Tuesday, 5 May 2020

जशास तसे पाहिजे होते ! (Just like that!)

जशास तसे पाहिजे होते ! (Just like that!)
या लेखा मध्ये पूर्वी भारत कसा होता आणि लिंकवर कसे अन्याय केलं व जसे लोक होती तसेच आपण हवे होते हे समजून सांगितलं आहे.

जशास तसे पाहिजे होते ! (Just like that!)

     हिंदुस्थान देश हा हिंदुस्थानांतील लोकांचा  रित आहे, हे राजकीय तत्व आतां कोठें हिंदुस्थानात उदय पावू लागले आहे.  हे तत्त्व लोकांच्या अंतःकरणभूमिकेमध्ये रुजवून त्याचा चांगला वृक्ष बनून त्याच्यावर येणारी फळे हिंदुस्थानांतील लोक चाखू लागतील याला अजून अवकाश आहे,  तोच येथे आलेल्या युरोपियन लोकांच्या पोटांत कळा निघू " लागल्या आहेत. या सद्-गुणी युरोपियन लोकांना मात्र दुसन्यांचे दश बळकावून बसायला पाहिजे. पण यांच्या देशांत जर कोणी परकीय मनुष्य जाऊ लागले,  तर मात्र ती गोष्ट यांना खपत नाही.
        युरोपियन आणि अमेरिकन लोकांनी चीनमध्ये जाऊन वाटेल तसा धिंगाणा घालावा ; पण चिनी लोकांना मात्र अमेरिकेच्या किनाऱ्यावर पाऊल टाकण्याची सक्त मनाई ! ट्रान्सवालमध्ये चिनी लोकांना खाणीतील काम करण्याला मजूर म्हणून अगदी आणणे भागच पडते ; पण हे देखील यूरोपियन लोकांना खपत नाही, व त्यासाठीच चिनी मजूरांच्या विरुद्ध इंग्लंडमध्ये नेहमी कुरकूर चालली असते.  हिंदुस्थान हे वास्तविक इंग्लिशांचे घर नसून त्यांत इंग्लिशांनी मनसोक्त शिरावे आणि वाटतील तसे लांब हात पाय पसरावे, पण त्याच हिंदुस्थानांतील लोक दक्षिण आफ्रिकेमध्ये गेले तर चोरांप्रमाणे यांच्या आंगठ्याचे ठसे उमलून घेतले जातात आणि जेथे परवानगी मिळेल तेथेच त्यांना दुकान घालून बसावे लागतें ! इतके जरी अपमान होत आहेत, तरी इंग्लिशांनी हिंदुस्थान देव दरिद्री करून सोडल्या-मुळे गरिबी इंडियन लोकांना परदेशात कोठेतरी निवारण करण्यासाठी जाणे भाग पडते.  
        त्यामुळे इंग्लिशांच्या लोभाने हिंदुस्थानांतून पिटाळुन लावलेले इंडियन लोक जिकडे वाट फुटेल तिकडे गेलेले आहेत.  अमेरिकाखंडांतील कानडा देशांतही आपले कित्येक देशबांधव गेलेले आहेत, हे आपल्यापैकी पुष्कळांना माहित नसेल. कानडा आणि युनायटेड स्टेटस.  ऑफअमेरिका यांची हद्द एकमेकांना लागून असल्यामुळे कानड्यांत ज्यांची सोय लागली नाही असे कित्येक मजूर युनायटेड स्टेटस मध्येही गेलेले आहेत.  ह्या प्रांतातील वॉशिंगटन संस्थानामधील बेलिंजीहॅम या नांवाच्या शहरों अशा प्रकारचे पुष्कळ हिंदु गिरणीतून मजुरीचे काम करण्याकरतां राहिले होते.  हे हिंदु मजूर थोड्या मजुरीवर पुष्कळ काम करीत असल्यामुळे त्यांना तेथील गिरण्यांमधून पटापट जागा मिळत असत. परंतु हाँगोष्ट तेथील गोऱ्या मजूर-दारांच्या डोळ्यांत अतिशय सलूं लागली.  
      त्यांचे तर्क-शास्त्र अगदी साधे आणि सरळ होते.  ते आपल्या मनाशी म्हणाले : " अमेरिका हा आमचा देश आहे.  व तो आमच्याच करतां असला पाहिजे. तो हिंदु मजुरांकरतां नाही.  यांना आपल्या देशातून हाकलून लावले पाहिजे. ” हा सरळ | विचार तेथील काही लोकांच्या मनांत येऊन त्यांपैकी सुमारें पांचशे गोरे अमेरिकन लोक गेल्या सप्टेंबर महिन्याच्या ४ थ्या तारखेच्या रात्री एकत्र जमले आणि हे परकीय हिंदु लोक ज्या ठिकानी 
गिरनीत काम करित होते,  तेथे त्यांनी त्यांच्यावर हल्ला केला.  तसेच त्या हिंदु लोकांची राहण्याची जी घरें होती,  त्यांचे दरवाजे फोडून ते आंत-मध्ये घुसले आणि ब्रिटिश साम्राज्याच्या छत्री-खालील त्या हिंदु लोकांना त्यांनी खूप मार दिला.
       जे गरीब बिचारे हिंदु लोक आपल्या घरी अंथरुणावर निजले होते,  त्यांना त्यांच्या अथरुणांतून ओढून मार देण्यात आला, व पुष्कळांना अतिशय जबरदस्त दुखापती करण्यात आल्या.  “ हिंदु लोकांना आपल्या देशातून घालवून द्या ! " अशा आवेशाच्या - आरोळ्या साऱ्या रात्रभर उत्तर अमेरिकेतील - बेलिंगहॅम शहरी ऐकू येत होत्या,  व जिकडे तिकडे दारे फोडणे, खिडक्या तोडणे, हिंदू ना मारणे, बायकांना गटारांत फेकून देणे, असे प्रकार चालले होते. असेच चालले असता अखेरीस रात्र संपली,  पण अमेरिकन लोकांचे दंगे संपले नाहीत. सकाळ झाल्याबरोबर फिरून त्यांच्या टोळ्या गिरण्यांकडे वळल्या, व त्यावेळी जे कोणी हिंदू लोक गिरण्यांतून कामे करतांना आढळले,  त्यांना त्यांनी ओढून गिरण्यांच्या बाहेर काढले. या दंग्यात दुखावत होऊन चार हिंदु दवाखान्यात पडले आहेत.  
         सुमारे चारशे वस्त्र-हीन आणि अर्धवट नागडे झालेले लोक तुरुंगामध्ये ( ! ) पोलिसांच्या सरंक्षणाखाली आहेत.  आणि ७५० लोक भयभीत होऊन आपल्या सत्ते साठी इंग्रज सरकारची जी कानडा देशाची सरहद तिकडे पळत सुटले आहेत. हा दंगा करण्याला बेलिगहॅम येथील जी सगळे लोक एकत्र झालेले नव्हते,  तरी ज्या लोकांनी दंगा केला यांना बाकीच्या लोकांचे इतके पाठबळ आहे की, दंगेखोरांतील कोणी पुढारी पकडून त्यांच्यावर खटले करावयास म्हटल्यास ती गोष्ट अगदी अशक्य झालेली आहे.                 
         हिंदु लोकांची परदेशातून अशी दुर्दशा चालली आहे,  तरी पण त्यांचे अद्याप डोळे उघडत नाहीत. पुर्वेकडील लोकांचा अलीकडे पश्चिमेकडील लेक बराच तिटकारा करूंलागले आहेत.  याची उदाहरणे ठिकठिकाणी दिसून येत आहेत. व्हकोव्हर येथेही पुर्वेकडील जपानी, चिनी आणि हिंदु लोकांवर तेथील गोऱ्या लोकांनी हल्ला केल्याची हकीकत पूर्वीच प्रसिद्ध झाली आहे.  त्या प्रसंगात जपानी आणि चिनी लोक गोऱ्या लोकांच्या हल्ल्याचा प्रतिकार करण्यासाठी एकत्र झाले, व तुम्हीही आमच्या-मध्ये सामील व्हा, म्हणजे आपण सगळे मिळून या गोऱ्या लोकांचा फन्ना पाडून टाकू,  असे ते हिंदु लोकांना म्हणत होते.  
      त्यावेळी हिंदु लोकांनी मुकाट्याने मार खाण्याचे पत्करिलें पण ते जपानी लोकांशी सामील झाले नाहीत !  " आम्ही ब्रिाटेश सरकारची प्रजा आहोत, आणि ब्रिटिश सरकार फार बलाढ्य आहे ! ते आमचेच । संरक्षण करण्याला किंवा आमच्या-करता सूड घेण्याला समर्थ नाही असें नाहीं ! " अशी आपल्या माने-वरील ब्रिटिश-साम्राज्याच्या जोखडाच्या शौर्याची महती गात गात नहँकोव्हरमधील हिंदु लोकांनों पोटभर मार खाल्ला ! | पण त्यांना आपल्या राज्यकर्त्यांच्या सजाती  यांवर यत्किंचितही हात उगारला नाही ! जपानी लोक नामात्र एकत्र होऊन आपले संरक्षण करून घेतलं, व त्यांच्यावर जी गोऱ्या लोकांची टोळी चालून येत होती तिला त्यांनी चोप देऊन माघारी पिटाळुन लाविली या आत्मसंरक्षणाच्या कृत्याबद्दल कानडा-च्या फेडरल गव्हर्नर भेटीतून जपानी लोकांची अतिशय तारीफच करण्यातं येत आहे व त्यांचे झालेले नुकसान भरून मिळाले असून शिवाय लौकरन्यायही मिळेल असे आश्वासन देण्यात आले आहे.  यावरून पुष्कळ गोष्टी घेण्यासारख्या आहेत. स्वतंत्र देशांतील मनुष्य असला म्हणजे तो स्वभावता कसा स्वावलंबी असतो आणि आमचे ब्रिटिश साम्राज्य आपल्या छत्रीखाली कसली माणसे निर्माण करित असते, हें या ठिकाणी परस्पर तुलनेवरून चांगले लक्षात येणार आहे.            
     गुलामगिरी-तील मनुष्याचे अंगांत हिंमत उरतच नाही.  त्याचे जुलुमकर्ते त्याला कितिही चांगले शिक्षण देत असोत,  किंवा त्याच्या उन्नतीसाठी कितीही झटत असोत, जे एक तेज स्वतंत्रते-मधील मनुष्यांच्या अंगात स्वाभाविकपणेच उत्पन्न झालेले असते तें गुलामगिरी-तील गुलामांच्या अंगात मोठ्या प्रयासानेही उत्पन्न होऊ शकत नाही.  व्हँकोव्हरमधील हिंदु लोकांना, तुम्ही जपानी लोकांशी एक होऊन तुमच्यावर उठले-ल्या गोऱ्या लोकांना त्य वेळी सडकून चोप द्यावयाला पाहिजे होता ! परंतु व्हँकोव्हर पेक्षाही, बेलिंगहॅममधील हिंदु लोकांनों, तुम्हाला एकत्र होऊन गोऱ्या लोकांच्या विरुद्ध टक्कर देण्याची जास्त अवश्यकता होती.  पण हे काम दोन्ही ठिकाणंही तुमच्या हातून झाले नाही.  

जशास तसे पाहिजे होते भाग २ ((Just like that!)

    अन्यायाने गोरे लोक तुमच्या-विरुद्ध उठत असतां तुझीही त्यांच्या विरुद्ध एकत्र होऊन उठलेच पाहिजे ! लोक तुमच्यावर काठ्या उगारतात आणि तुम्ही ब्रिटिश साम्राज्यावर हवाला ठेवून त्याचा स्वस्थ मार खाता,  याला काय ह्मणावें तुमच्यावर ब्रिटिश साम्राज्य आहे हे पण, ते फक्त तुमच्या-पासून कर घेण्या-करितां आहे. गोऱ्या लोकांच्या विरुद्ध जगाच्या कानाकोऱ्यातून तुमचे संरक्षण करण्याकरता तें आहे असे तुम्हाला कोणी सांगितले ? असा तुमच्या डोक्यांत अजून भ्रम असेल,  तर लवकर काडून द्या. हिंदु लोकांना, तुम्ही आपल्याला कोण समजता ? तुम्ही काही लोक नव्हे ! तुम्ही नुसते ब्रिटिश साम्राज्या. खाली रहात असलां, म्हणून काय झाले ? जरा आपल्या अंगाकडे पहा ! तुमच्या कातडीचा रंग कांही गोरा नाही ! तुम्ही जर गोरे लोक असतां, तर मग तुमची समजूत बरोबर ठरली असती.  
       मग तुमच्यासाठी सगळ्या उत्तर अमेरिकेवरोबर देखील एक जंगी लढाई झाली असती ! कांहीं धार्मिक मिशनरी आणि राजकीय वकील मारले गेल्या.  बद्दल युरोपियन राष्ट्रांनी चीन-देशावर सूटउगविला, तसेच ब्रिटिश साम्राज्य तुमच्याकरतां धावून येईल, असेच तुम्हांला वाटले होय ! सगळ्यांच्याच करताच ब्रिटिश साम्राज्य असेच धांव असें नाही ! एकदा कांही बैलांच्या पायाखाली एक मुंग्यांचे वारूळ तुडवले जाऊन त्यांत तीन लक्ष त्रेसष्टहजार सातशे व्ब्याण्णव मुंग्या मारल्या गेल्या,  व दुसऱ्या एके वेळी नुकत्याच एका पावसाळ्यात एका शेणखळीजवळ काही टोणगे एकमेकां-पाशी लाडाने झुंजत असता त्यांच्या पायाखाली किड्यांचे आणि गांडुळांचे सुमारे पांच-लक्ष वस्तीचे एक शहराच्या शहर नामशेष होऊन गेलें ; व या दोन्ही गोष्टी ब्रिटिश-साम्राज्याच्या निर्विवादपणे ठरलेल्या हद्दीच्या आंत घडून आल्या होत्या ! पण त्याबद्दल ब्रिटिशसाम्राज्याने कधी लढाई केल्याचे कोणाला एकण्यात नाहीं ! तुम्हाला असा गर्व वाटत असेल की,  ट्रान्सवालमध्ये ब्रिटिश साम्राज्याचे आपल्या करताच लढाई केली होती ! पण मूर्य सद्गृ हस्थहो, तुमचेच नांव हे जरी त्या वेळी एक दिखाऊ निमित्त करण्यात आलेले होते, तरी तो लढाई वास्तविक. 
क पणे तुम्हां लोकांकरतां नसून ती ट्रान्सवाल ' मधील हिऱ्यांच्या खाणींकरतां होती.  हिंदुलोकांनो, तुम्ही हे पक्के लक्षात ठेवा की, तुमच्याकरतां तुम्ही स्वतःच जर लढला नाही,  तर तुमच्याकरतां दुसरें कोणीही लढणार नाही ! _ _
         हिंदुस्थानांतील लोकांना,  तुमच्यावर आज जो हा स्वसंरक्षणासाठीदेखील ब्रिटिश समाजाच्या तोंडाकडे पाहण्याचा प्रसंग आला आहे तो कदाचित् खात्रीने कधीही आला नसता.  आज इतर देशांतील गोरे लोक तुमच्याशी ज्या रीतीने वागत आहेत त्या रीतीने जर तुम्ही त्यांच्याशी दोनशे वर्षांच्या पूर्वी वागला असतो, तर खात्रीने आज तुम्हाला अापले पोट जाळण्यासाठी बेलिंगहॅम शहरांत जाऊन मार खाण्याची पाळी आली नसती. अठराव्या शतकांत हिंदुस्थानात तुम्ही स्वतंत्र होता,  आणि पाहिजे ते करण्याला समर्थ होता.
          हल्ली इंग्लिश आणि आपण त्याने स्नेही झालो आहोत आणि करा-राने राजा व प्रजा यांचे नाते आपल्यामध्ये उत्पन्न झाले आहे.  त्यामुळे हल्ली धूर्त आपण त्यांच्याशी जरी राजनिष्टेने वागले पाहिजे हे खरे आहे, तरी त्यावेळी तुझी असे बांधले गेलेले नव्हता.  त्यावेळी तुम्हांला आपल्या घरांत पाहिजे तें करता आले असते. हल्ली परकीय लोक तुम्हांला वागवित आहेत, त्याचप्रमाणे तुझी त्यावेळी त्यांना वागवायाला पाहिजे होते.  इतकेच नव्हे तर तसे करण्याला तेव्हां तुझांला अतिशय जबरदस्त कारणेही होती. तुम्ही यःकश्चित् मजुरी करण्यासाठी म्हणून दुसयांच्या देशांत जाता ; पण दुसरे लोक तुमच्या हिंदुस्थान-देशावर राज्य करण्याकरता,  तुमच्या छातीवर नाचण्याकरतां, तुमच्या हाता-पायांत परतंत्रतेच्या विड्या घालून तुम्हाला गुलाम करण्याकरता, आणि तुमच्या वंशमांना भिकेस लावण्या-करता तुमच्या देशांत येत होते ! तुम्ही नुसते मजूर होण्याकरता दुसऱ्या देशांत गेला तर तुम्हाला लोक आपल्या देशातून हाकलून लावतात,  आणि तुमच्या देशांत लोक तुम्हां बैलांच्या मानेवर परवशतेचे जोखर ठेवून तुमचे राजे होण्याकरतां आले, त्यांचे तुम्ही त्यावेळी मोठ्या थाटाने स्वागत केले आणि त्यांच्यावर चौऱ्या मोर्चलें फिरवू लागला ! The state of Washingtion is a whte man's country म्हणजे वाशिंगटन हे संस्थाने गोऱ्या लोकं आहे,  येथे हिंदु लोकांना आम्ही येऊ देणार नाही, असें म्हणून दुसरे लोक तुम्हांला आपल्या देशातून पिटाळुन लावीत आहेत : हिंदू लोकांनो, तुह्माला दोनशे वर्षों च्या पूर्वी असेंच म्हणता येत नव्हते काय ? किंवा त्यावेळी तुमची वाचा बसली होती ? इतर देश जर काळ्या लोकांकरतां नाहीत, तर हिंदुस्थान तरी गोऱ्या लोकांकरतां आहे की काय,  असें तुम्ही त्या वेळी कां विचारले नाही ? तुम्हांला आपल्या वंशजांची कांहीच काळजी कशी वाटली नाही ? आपले नातू आणि पणतू पुढे परतंत्रतेच्या आणि श्रध्देचा एकवटले-ल्या वेदनांनी व्याकूळ होऊन दारो दार फिरतील, भीक मागतील, आणि दुष्काळामध्ये उपासमारीने प्राण सोड-तील, हे पुढील अघोर आणि भयंकर परिणाम तुमच्या कल्पनेच्या डोळ्याला कधी दिसलेच नाहीत 
कसे ? ज्या तुह्मी आपल्या भावी पिढ्यांच्या बद्दल इतका निष्काळजीपणा दाखविला ते तुह्मी खरोखर फार पाषाणहृदयी असला पाहिजे.  दुसरे कोणीही बाप आपल्या वंशांतील पढील मुलांबद्दल इतके निर्दय झाले नसते. 
      असो हे दीडशे दोनशे वर्षाच्या पूर्वीचे विचार आहेत.  ते आता आठवून मनाला विनाकारण उद्विग्नता उत्पन्न करून घेण्यांत तरी काय मिळणार आहे ? त्यापेक्षा हल्ली आपण ज्या स्थितीत येऊन पडलो आहों तिच्यामधून बाहेर कसे निघू भाणि आपले स्वराज्य आप ल्याला कसे मिळेल याचे विचारच आपल्या ला जास्त फायदेशीर आहेत.

       या लेखाचे तीन खंड आहे ते आपण यानंतर पाहू. तुम्हाला हा लेख आवडला असले तर तुमच्या प्रतिक्रीया पाठवा.

No comments:

Post a comment