Tuesday, 5 May 2020

The Events In The Race (शर्यतीमधील एक प्रसंग)


शर्यतीमधील एक प्रसंग. (One of the events in the race)


 हिंदुस्थानात पुष्कळ लोक अजून असे आहेत की,  ज्यांची राज्ये गेली असून ते अद्याप राजांमध्ये मोडतात.  पण यांत इंग्रजसरका रची मात्र बिलकूल कसूर नाही. वास्तविक पाहिले असता ते राजे म्हणून म्हटले जातात ही केवळ इंडियन लोकां-चीच चूक आहे. 
The Events In The Race

शर्यतीमधील एक प्रसंग.


            
        ज्याचे राज्य काढून घेतले आहे त्याला राजा हा शब्द लावला जावा हा शब्दशास्त्रांतील एक अक्षम्य गुन्हा होय.  आणि सर्व गुन्हे हद्दपार करून टाकण्याकरतां हिंदुस्थानात अवतीर्ण झालेल्या इंग्लिश लोकांनी हाही गुन्हा होऊ न देण्या-विषयी तजविजी केलेल्या नाहीत असे नाही.  ज्यांच्या-पाशी राज्य उरू दिलेलेच नाही त्यांना इतःपर कोणीही राजा म्हणू नये, असे जाहीरनामेसुद्धा इंग्लिशांनी आपल्याकडून काढले आहेत. तरी पण अज्ञानी लोकां-पुढे इंग्लिशांचेही काही शहाणपण चालत नाही.  ते त्यांना राजे म्हणतात.  
         अशा राजांचा वर्ग हिंदुस्थानात हल्ली बराच मोठा आहे.  अशा वर्गापैकी एक राजे काही दिवसापूर्वी एक घोड्याची शर्यत चालली असता तेथील मजा पाहण्याच्या इच्छेने आले होते.  शर्यत पाहण्याकरता एक भव्य तंबु उभारलेला असून त्यांत बरेच लोक बसतील अशी जागा तयार, केलेली होती. मध्यभागी काही उंच जागा केलेल्या असून त्या मात भरा-वयाच्या राहिलेल्या होत्या.  बाकी खालच्या सर्व जागा भरून गेल्या होत्या.  
      त्यांतच मी एके ठिकाणी बसलो होतो.  तंबूमध्ये बहुतेक युरोपियन लोकां-चीच गर्दी होती.  आणि त्यातल्या त्यांत सुद्धा युरोपियन पुरुषापेक्षा बायकांच्या गर्दी चे प्रमाण जास्त होते.  त्यांनी न भरलेल्या जागेवर मधून मधून काही श्रीमंत व्यापारी, काही बढे पाशी, काही सामान्य मुसलमान,  कांहीं सरदार, आणि काही नेटिव राजांची रिकाम टेकडी मुले वगैरे मंडळी बसलेली होती. शर्यत सुटण्याला अगदी थोडा वेळ राहिला,  इतक्यात वर सांगितलेल्या राजे-साहेबांची स्वारी तंबूमध्ये आली. कोणीही नवीन मनुष्य आमा झणजे हा कोण असावा, अशाबद्दल जिकडे तिकडे आपसांत जिज्ञासा आणि विचारपूस चालू होत असे.  हे राजेसाहेब आले त्या वेळी तेथें जनसमुदायामध्ये जी कुजबूज झाली त्याच्यावरून मला असे कळले की, ज्यांचे राज्य पूर्वी एकदा कदाचित् सारया हिंदुस्थान.  
      भर पसरले असते अशा राजांच्या एका घरातील हे राजे आहेत.  त्या घराण्याचा पूर्वीचा दरारा आणि हल्लींची त्यांची अपमानास्पद स्थिति,  पूर्वीचे त्या कुळांतील प्रौढ-प्रतापी राजे आणि हल्लींचे हे त्या घरण्यांतील पुरुष,  ही स्थिति पाहून माझ्या मनाला अतिशय वाईट वाटले. माझें मन अशा खिन्नावस्थेमध्ये होते इतक्यांत कोणी त्या राजेसाहेवांना खुर्ची दाखवली आणि ते आपल्या खुर्चीवर येऊन बसू लागले.  त्या वेळी पूर्वीच्या संबंधाने त्या राजेसाहेबांच्या हाताखाली असे कोणी चार - पांच सरदार तेथे बसलेले होते, ते राजे. साहेबांना पाहून उठले त्यांनी, राजे साहेबांना मुजरा केला,  आणि हे राजे साहेब त्यांस दाखवलेल्या खुर्चीवर बसल्या नंतर पाठी मागून ते आपापल्या जागी बसले. 
      तो देखावा पाहून माझ्या मनाला फार वाईट वाटले.  आणि माझ्या मनांत अनेक विचार उत्पन्न होऊ लागले : - " हा आपला राजा वास्तविक आपण याची प्रजा ! याच्या पूर्वजांचे आपल्या देशावर आणि आपल्या देशांतील लोकांवर अनंत उपकार झालेले आहेत ! याच्या पूर्वजांनी आपल्या देशाला देश बनविले आणि आपल्या लोकांना स्वतंत्र केले.  
        याच्या पूर्वजांनी आपल्या धर्माच्या संरक्षणा करतां लढाया केल्या,  आणि आपल्या पूर्वजांचें योग क्षेम यांनी चालविले. त्या महात्म्यांचे हे वंशज असून यांच्यावर आज किती दुर्धर प्रसंग आला आहे पहा ! त्यांना कोणी फुकटचा सन्मान देखील देत नाहीं ! हे आज सभेत आले तर त्यांना उठून खडी ताजीम देण्याइतकेसुद्धा कोणी गरीब राहिले नाहीत,  हे केवढें आश्चर्य आहे ! हे राजे साहेब येथे आले असता त्यांना मुजरा करण्याकरतां फक्त चार पांच जुन्या सरदारांनी उठावे काय ? या जुन्या सरदारांवरच फक्त त्यांनी उपकार करून ठेविले आहेत काय ? आणी या ठिकाणी बाकीचे इंडियन लोक थोडे थोडके आहोत ? आणि आमच्यावर यांचे कांहींच उपकार झाले नाहीत काय ? आज हे इतके गरीब झाले काय की,  यांना मुजरा करण्याकरता उठण्याइतका कमी योग्य तेचा माणूस हल्ली कोणीच उरला नाही ! जेथें सर्व लोकांनी उठून खडी ताजीम द्या-वयाला पाहिजे, तेथें चार पांच जून्या सरदारांपेक्षा दुसरें कोणीही निघू नये ही किती दुःखाची गोष्ट आहे !
पण हजारो लोकांच्या समुदाया मध्ये आपल्या ला खडी ताजीम देण्या करितां फक्त चार पांचच जुने सरदार उठले,  आणि बाकी कोणी आपल्याकडे फारसे लक्षही दिलं नाही, हे पाहून | मला जसें वाईट वाटत आहे, तसेच खुद्द राजे  साहेबांना वाटत असेल काय ? किंवा नेहमीच्या अपमानाच्या सवयीमुळे त्यांचे लक्ष असल्या गोष्टींकडे मुळीच जात नाही,  हे पहाण्याकरिता मी त्यांच्याकडे आपली दृष्टि वळवली त्या वेळी त्यांची मुद्रा फार खिन्न आणि उदास दिसत होती, व त्यांचे लक्ष त्या तंबूत मध्यभागी ज्या  उच जागा केलेल्या होत्या त्यांच्याकडे पूर्ण पणे वेधून गेले असल्याचे माझ्या दृष्टोत्पत्तीस आले. आणि ते पाहून माझ्या मनांत फिरून विचार उचंबळू लागले.  
    “ महाराज या मध्यभागच्या उंच जागेकडे कां बरें इतके टक लावून बघत आहेत ! गव्हरनर साहेबांकरता तयार केलेली ही जागा पाहून महाराजांच्या मनांत काय बरे विचार घोळत असतील ! बहुततेकरून महाराज आपले मनांत झणत असतील,  ही उंच जागा कोणाकरतां तयार केलेली आहे ? 
माझे पूर्वज असल्या मुद्दाम तयार केलेल्या सिंहासन-तुल्य जागेवर सदोदित बसत असत.  आणि वास्तविक पाहिले असता माझाही तेथेच बसण्याचं मान ! पण आज ते सर्व जाऊन मला लोकांच्या सिंहासनांच्या खाली एका बाजूला कोठे तरी बसण्याचा प्रसंग आला आहे ! आणि ज्याच्यावर मी बसलो असतो ती सिंहासनाचा जागा दुसर्याच्या करता राखून ठेवण्यात आलेली आहे.  मी आणि माझे पूर्वज कोणत्याही दरबारात | गेलो असता तेथे सर्वजण उठून आमाला खडी ताजीन देत असत. 
      परंतु तोच मी आता इतक्या पंगतीला येऊन पोहोंचलों की माझ्यासाठी या पांचांहून कोणाही सहाव्याला उठण्याची अवश्यकता वाटत नाही ! ' असे | विचार मनांत चालले आहेत तो इतक्यात तबुच्या बाहेर बरीच गडबड सुरू झाली व तिचा प्रवेश हळूहळू होऊ लागला. 

शर्यतीमधील एक प्रसंग भाग २ (One of the events in the race)

      थोड्याच वेळांत तबुतील सर्व लोक उठून उभे राहिले आणि गव्हर्नर साहेब,  त्यांच्या पत्नी, व इतर काही मंडळी आत येऊन दाखल झाली. तंबूच्या दरवाजापासून मध्यभागची उंच जागा फारशी दूर होती असे नाही.  तरी पण वाटेतील प्रतिष्ठित मंडळींशी शेकह्मांड करीत करीत सिंहासनापाशी येई पर्यंत गव्हरनर साहेबांना दोन तीन मिनिटें लागली. परंतु त्यांच्या मॅडम साहेब एके ठिकाणी जास्त वेळ बोलत उभ्या राहिल्या मुळे सर्व मंडळीला त्यांच्यासाठी म्हणून आणखी दोन मिनिटे उभे रहावे लागले ! या प्रमाणे सरासरी पांच मिनिटे उभे राहिल्या.  नंतर, गव्हरनर साहेब आणि त्यांच्या साहेब आपल्या उच्च सिंहासनारूढ झाल्यावर सर्व कोक खायला बसले. हा जो विरोध माझ्या डोळ्यांदेखत दिसून आला तो पाहून तर माझं मन फारच उद्विग्न झालें. " गव्हरनर साहेबांच्या मॅडम साहेबासाठी देखील आपल्या देशांतील मोठमोठे लोक । दोनदोन तीन तीन मिनिटे वेड्यासारखे खडे उभे राहतात. आणि प्रत्यक्ष आपले राजे आले असता त्यांना सन्मान देण्याला चार किंवा पांच याहून कोणी जास्त निघत नाहीत,  हे केवढे पूर्व विस्मरण ? आपल्या राजांना आपण मान दिला नाही, तर त्यांना कोण मान देईल ? आणि ते कसे मोठे होतील ? आपणच त्यांना मोठे केले पाहिजे. 
      एरवी त्यांना उत्तेजन कसे मिळेल ? " असे विचार माझ्या मनांत घोळत आहेत इतक्यात शर्यतीतील घोडे सुटण्याची वेळ झाली.  त्यामुळे सर्वांचे लक्ष तिकडे वेधून गेले. घोडे बरोबर उभे करण्यातं आले शर्यत सोडणारे साहेब एका हातात घड्याळ आणि दुसऱ्या हातात खुणेचे निशाण घेऊन घड्याळाकडे पाहत उभे राहिले.  बरोबर साडे चारवर काटा येतांक्षनी साहेबांच्या हातातील मनिशाणाने इशारत दिली. आणि सर्व घोडे भरधाव पळण्याला सुरवात झाली. सर्वांच्या खिशांतून बायनॉक्यूलर्स बाहेर पडल्या ; आणि कोणता घोडा शर्यत जिंकणार याबद्दलच्या अनुमानांना प्रारंभ झाला.  
    परंतु हा सगळा वेळ आमचे महाराज काय करीत होते ? घोडे अगदी पळू लागले,  तरीदेखील ते या कडे किंचित् सुद्धा उत्सुक झालेले दिसले नाहीत. लोकांत आपापल्या बारश्या काढून त्यांची भिंगें पुसण्याचा गडबड सुरू झाली,  तरी हे आपले स्वस्थ होते ! आणि सर्व लोक शर्थतीच्या वर्तुळाकडे लक्षपूर्वक पाहत असतां यांची दृष्टि तेथे जमलेल्या सर्व युरोपियन आणि इंडियन लोकांच्या तोंडाकडे लागलेली होती.  ती त्याच्या तोंडावरील उदासीनता पाहून त्यांच्या मनात काय विचार चालले असतील याची कल्पना करणे फारसे कठीण नव्हते. 
      तें म्हणत असतील की,  " काय हा खेळ चालला आहे ! लोक या शर्यतीचा खेळांकडे पहात आहेत,  पण मी आपल्या नशिबाच्या खेळांकडे पहात आहे ! आमचे घराणे या शर्यतीचा खेळांत एकदा सवया पुढे होते.  पण दुर्दैवाने ते आमचे घोडे थकून आज खाली बसलेत आहे ! जेव्हां दैवाची अनुकूल दृष्टि आमचे-कडे वळेल तेव्हां आमी हिंदुस्थानांतील राजे फिरून आपल्या शर्यतीत सगळ्यांच्या पुढे धावू लागू ! हे लोक वेडे तर नाहीत ? यांत हे काय पाहतात ? " बहुत करून त्यांच्या मनांत असले विचार चालले असावेत.  आपल्या राज्याची आणि आपल्या देशाची झालेली अशी हीन स्थिति पाहून माझ्याही डोळ्यांतून अश्रुबिंदु वाहू लागले. आणि माझ्या तोंडून पुढील उदार निघाले : - " या शर्यतींतील घोडे म्हणजे केवळ पशू होत. आणि पशूना ज्ञान नसते असे आपण समजतो. तरीपण तेसुद्धा एकमेकां. च्या पुढे जाण्यासाठी अगदी प्राण टाकीत | आहेत ! पण आम्हा इंडियन मनुष्यांना त्यांच्या इतकीही महत्वाकांक्षा नाही,  इंग्लिशांचे घोडे हिंदु स्थानच्या शर्यतीत आपल्या घोड्यांच्या पुढे गेलेले आहे, हे चांगले नाही. आपण मागे राहता कामा नये. हिंदुस्थानात राज्या करता शर्यत पुष्कळ दिवस-पर्यंत सुटलेली आहे, आणि त्या शर्यतीत युरोपियन लोक आज पुष्कळ पुढे गेलेले आहेत. 
      एक घोड्यांच्या पुढे दुसरा घोडा जाऊ लागला तर त्या मूढ पशूला देखील वाटते की,  भी याला पुढे जाऊ देणार नाही. हिंदुस्थानांतील राजांना आणि लोकांनो, आपणही अशीच इर्षा धरली पाहिजे की,  आपल्या देशाच्या मैदानावर जीही राज्याची शर्यंत चाललेली आहे, त्यांत अपण हिंदुस्थानांतील लोक कोणालाही पुढे जाऊ देणार नाही.
 एक शर्यत पाहणारा. 

No comments:

Post a comment