Tuesday, 5 May 2020

Two Friends and a military story in Marathi

Two Friends and a military story in Marathi(दोन मित्र आणि एक सैन्य कथा)

 या लेखामध्ये दोन कथा दिल्या आहेत त्यात पाहिली दोन मित्रांची आणि एका सैन्य कथा दिली आहे.
Marathi Katha
Marath katha

दोन स्नेही.  (Two Friends Story)

एका शहरामध्ये कोणी दोन गृहस्थ एकमेकांचे अत्यंत स्नेही होते.  त्यांच्यमध्ये कपट असे तें कधी नव्हतंच. ते एकमेका-पाशी अगदी मोकळ्या मनाने बोलत असत.  त्यांपैकी एकजण सुखवस्तू गृहस्थ होते, आणि दुसऱ्याला कस्टमर खात्यात नोकरी होती. ते एक मेकांच्या बऱ्यावाईटाची नेहमी चौकशी करीत असत,  व एकमेकांची दुःखें हलकी करण्या साठी बोलत असत. एके दिवशी ते दोघे सहज गप्पा मारीत बसले असतां “ तुमचे हल्लीचे नवीन आलेले साहेब कसे काय, चांगले आहेत का?  " म्हणून एकाने दुसर्याला सहज प्रश्न विचारला. त्या वेळी त्यांचे स्नेही जे सरकारी नोकरीत होते ते चवताळून उठले आणि आपल्या स्नेह्याला म्हणाले “ हा काय तुम्ही प्रश्न विचारतात?  साहेब आहे म्हणजे तो कसा असणार? हे तुला अजून समजल नाही, ही मोठी आश्चर्याची गोष्ट आहे. साहेब दुसरा कसा असणार, साहेब आणि तो आपल्याला चांगला आहे कसें संभवणार?  
          आमचा नवीन आलेला साहेब एका दृष्टीने चांगला आहे ! किती छान दिसतो ! त्याच्याअंगावरील 
कातडीचा रंग अतिशय गोरा आहे | आणि त्याचे अंगांतील कपडे अगदी स्वच्छ असतात ! शिवाय तो बोलतो देखील किती गोड ! हा आपला चांगले-पणा पाहिजे तर आमच्या नवीन साहेबांस पुष्कळ आहे.  पण तो आपल्याला काय करावयाचा आहे? आपल्या मध्ये लोकांत हा साहेब चांगला आणि तो साहेब वाईट असे भेदाभेद करण्याची मोठी वाईट चाल पडून गेली आहे. पण एका साहेबांस चांगले मटल्याने दुसऱ्या साहेबाचे मन दुखिवले जाते हे कोनाच्याच लक्षात येत नाही ! शिवाय आपले लोक एखाद्या साहेबांस.   चांगला म्हणतात, याचा अर्थ काय? एखाद्या मापन आपल्या शिरस्तेदाराच्या मार्फत एखाद्या वादाचे पैसे घेऊन त्याच्या बाजूचा फैसला दिला, म्हणजे त्याला तो साहेब चांगला झाला ! एखाद्या कमिशनरने अडकून लांच खाऊन कोणाची वतने सोडवली, तर त्या कमिशनरासारखा दुसरा साहेब नाहीं ! एखाद्या एंजिनियरने आपला गुप्त हिस्सा ठेवून एखाद्या कॉन्ट्रॅक्टरचे टैंडर पास केले की,  त्या कॉन्ट्रॅक्टरच्या पितृ-गणांच्या यादीत त्याला जागा मिळते ! आणि एखाद्या पोलिटिकल एजटने रत्नखचित नजराणा घेऊन एखाद्या सस्थानिकाचे काही भिकारडें काम करून दिले असले, तर तो विलायतेस गेल्या-वरही येऊन त्याला त्याच्या चांगुलपणा-बद्दल पत्रे, आणि नजराणा जात असतात ! अशा अर्थाने मी कोणत्याही साहेबाला चांगला म्हणण्याला तयार नाही.                
        कारण अशा रीतीने चांगले म्हणणे म्हणजे माला त्या शिव्या देणे होय.  कारण अशा ठिकाणी अमुक अमुक साहेब
हेबग चांगले होते म्हणजे काय तरते लांच खाऊन विश्वासघाताची कामें करणारे होते ! पण साहेबांना असल्या खराब शिव्या देणे मला बिलकूल पसंत वाटत नाही.  उघड उघड रीतीने बोलावयाचे असते, तर साहेबांत चांगला आणि वाईट हा भेद कसला? राष्ट्रीय दृष्टीने कोणताच साहेब चांगला नाही, हे तुमच्या नाही लक्षात येत?  कोणता साहेब चांगला तूम्ही म्हणणार? आणि तो कशासाठी? आज पर्यंत कोणता साहेब चांगला होऊन गेला की, ज्याने तुमचे ज्यांनी सगळे तुमच्या हवाली केले? ईस्ट कंपनी स्थापन झाल्यापासून तों आजपर्यंत जे साहेब आला तो तुमच्या-पासून काही तरी घेऊनच गेलेला आहे. बरें,  एखाद्याने कोहळा नेऊन त्यांतला आवळा दिला असला, तरी तो देखील तुमचाच. आणि तुम्हाला दिला ना? इंग्लंडांतील कांही दहा पांच रुपये आणून त्याने तुमच्या हातावर ठेवले असें कधी तुम्ही एकलें आहे काय? क्लाईव्ह साहेबां. पासून तो फर्शनसाहेबांपर्यंत सगळ्यांनी मिठीत हिंदुस्थान घेतले.  हिंदुस्थान देणारा यांतला एक तरी साहेब निघाला आहे काय? जुन्या लोकां-पैकी काही काही लोक मोठे खुळसट असत. त्यांच्या तोंडून एलफिन्स्टनसाहेबांची स्तुति एकण्यात येत असे.  

     “ एलफिन्स्टनसाहेब मोठे चांगले ! ते त्या वेळी होते म्हणून कोणाला त्रास झाला नाही ! त्यांनी सगळ्यांना आश्वासने दिले आणि सर्वांचे हक्क कायम राखले ! " असले स्तुति-वाद पेशवाई बुडवल्यानंतर एलफिन्स्टनसाहेबां संबंधाने ऐकू येत असत ! ज्यांच्या हातून पूर्ण पेशवाई बुडवली त्यांच्या संबंधाने हे जुने उद्गार ऐकून हल्लीच्या कोण त्याही मनुष्याला शरम वाटल्यावांचून राहणार नाही.  एलफिन्स्टनसाहेबांनी कोणाला. ही त्रास दिला नाही ! आणखी काय त्रास द्यायचा ? सगळे राज्य घेतले हे काहीच बास नव्हे !  ब्रह्मदेवाने जरी एखाद्या जुलमी राजाचा अवतार घेतला,  तरी त्याला यांना त्रास देतां येईल किंवा नाही कोण जाणे ! मोठ्या फुशारकीने सांगतात की,  एलफिन्स्टन साहेबांनी सगळ्यांचे हक्क कायम राखले : स्वराज्य घेतल्यावर कोणते हक्क राहिले ? एलफिन्स्टसाहेबांनी सगळ्यांचे गुलामागरीचे हक्क कायम राखले,  एवढे मात्र खरें ! दुसरी अशी एक आपल्या लोकांत आणण्याची चाल पडून गेली आहे की, मागे साहेब लोक फार चांगले येत असत आणि अलीकडे फार वाईट साहेब येऊ लागले आहेत.  या गोष्टी मध्ये काही अर्थ नाही. पहिले साहेब लोक चांगले म्हणजे, जेव्हां साहेबांची कसबें अज्ञानी नेटिव लोकांस समजत नव्हतो, आणि लोकांची बोलीचाली, रीतभात,  वगैरे अज्ञानी साहेबांना कळत नव्हती, तेव्हां साहेब लोक अवश्यकतेनेच चांगले केले होते. पण देशहिताच्या दृष्टीने पाहिले, तर पहिले चांगले आणि आताचे वाईट ते दोघेही सारखेच ! पहिल्या चांगल्या साहेबांनी ' हिंदुस्थानांतील,  हजारों लोक उपाशी मरत आहेत, आपल्या एकट्याला दोन हजार रुपये पगार कशाला पाहिजे, ' म्हणून पगार एक तर कधी कमी केलं होती का ?
        तुम्ही हे पक्कं लक्षात ठेवा कीं,  साहेब लोक हे हिंदुस्थानात तुमच्या फायद्यासाठी आलेले नाहीत.  आणि हे लक्षात बाळगून तुझी काय ती चांगल्या वाईटाची निवड करीत चाल्हे भाषण ऐकून त्यांचे स्नेही अगदी थक्क झाले,  आणि त्यांच्या युक्ति वादाच्या भडिमाराखाली अगदी चीत होऊन पडले. पुढे काही वेळाने सावध होऊन ते म्हणाले ; “ छ बुवा ! ही तुमची सत्य विचाराची सरळ दिशा माझ्या डोक्याला अजून कधी माहीतच नव्हती.  त्यामुळे मला ती अजून पचविता येत नाही ! माझे डोक्यांत कसतरी होत आहे. तेव्हां तें शांत करण्याकरता मला एखादें नेम-स्त वर्तमानपत्र वाचायला हवा बराच वेळ फिरून फिरून वाचीत बसले पाहिजे ! " असें म्हणून ते सुधारक-पत्राचे अंक शोधण्यास. करितां गडबडीने उठून गेले !


एक लष्करी गोष्ट.  (A military Story).

एके प्रसंगी नेपोलियनचे सैन्य स्पेन देश काबीज करण्याकरिता त्या देशांत जिकडे तिकडे पसरले असतां फ्रेंचांच्या छावणीला स्पॅनिश लोकांनी वेढा दिला.  स्पॅनिश लोक त्या देशांतील पुरे माहितगार असल्यामुळे व त्यांनी ज्या जागा रोखल्या होत्या त्या फार मजबूत असल्यामुळे त्यांचा वेढा फोडून त्यांतून बाहेर जाण्याची फ्रेंच सैन्याला मुळीच आशा उरली नाही.  त्या वेळी नेपोलियन माद्रिड शहरी होता. त्याला ही स्थिति कळवावी म्हणजे तो स्पॅनिश लोकांवर दुसरीकडे कोठेतरी हल्ला करील, म्हणजे त्यांच्या मदती-करितां येथील स्पॅनिश आपोआपच उठून जाईल, अशी एक युक्ति सुचविण्यात आली.  पण ही युक्ति अमलांत येते कशी ? शत्रूचा वेढा इतका काही कडेकोट बंदोबस्ताचा पडला होता की, त्यातून एक मनुष्यसुद्धा बाहेर जाण्याची आशा नव्हती. परंतु स्वदेशभक्तीच्या परिक्षेची हीच वेळ असते. इतक्या सगळ्या अडचणीतून मी नेपोलियन कडे जातो,  असें म्हणणारा एक तरुण शिपाई निघाला. त्याच्या ऑफिसरने त्याला म्हटले की, " तू कसा जाशील ? तू खात्रीने शत्रुच्या हाती सापडणार, आणि ते तुला फासावर चढवणार ? " यावर तो शिपाई म्हणाला, “ त्याची तुम्हांला काळजी नको.
      तुम्ही मला हुकूम द्या म्हणजे झाले.  " अशा रीतीने त्याने एकदाचा हुकूम मिळविला. पुढे तेथे एक वृद्ध साधु रहात असे,  त्याच्याकडे तो गेला, आणि त्याला सगळी हकीकत सांगून तो म्हणाला, " तु माझ्याबरोबर आले पाहिजे.  
       आपण बरोबर दोन पिस्तुल घेऊ.  एक तुमच्या-करितां व एक माझ्या-करितां.  तुमचा साधूचा पोषाख असल्यामुळे व येथील लोक तूम्हाला पूज्य मानित असल्यामुळे आपण स्पॅनिश सैन्यामधून जाऊं लागलों असतां बहुतेकरून आपणाला कोणी आडवणार नाही.  आणि बाही वरती कोणी तुम्हाला विचारलेंच, तर तुम्हाला काय वाटेल तो बहाणा करा. हा आमचा चेला आहे म्हणा, हा आमच्या मठांतील आहे म्हणून सांगा, किंवा तुम्हाला जें कांही सुचेल तें बोला. मला कोणी विचारले तर मी एक अक्षरही बोलणार नाही.  अर्धागवायु च्या झटक्याने माझी जीभ लुली पडली आहे, माझ्याने बोलता येत नाही, माझा बाप माद्रिड शहरांतील एक बडा माणूस आहे, त्याच्याकडे मला औषधोपचारासाठी नेऊन पोचविण्यांत येत आहे, असा किंवा दुसरा कोणताही तुम्ही बहाणा करा. दोघांनी बोलता उपयोगी नाही.  दोघे बोलूं लागलों म्हणजे आपल्या दोघांच्या बोलण्यांत फरक पडून आपली लबाडी उघडकीस येईल. याकरिता मी मक्याचे सोंग घेतो. आणि याही वरती आपण ओळखले गेलो, तर मग मात्र आपल्याला जिवंत राहण्याची आशा नको. परंतु आपल्याला या स्व-देशसेवेच्या कामात अपयश यावयाचेंच नाही,  असें माझी मनोदेवता मला सांगत आहे.  
     " अशा रीतीने त्याचे मन वळवून तें दोघे जण निघाले.  धैर्यावर संकट क्वचितच येतात. आणि दृढनिश्चयाला व स्वदेशमकीला परमेश्वर यश देत नाही असे प्रसंग अाढळतात.  वेडा घालणारा स्पॅनिश सैन्यातील लोक त्या साधु-च्या पाया पडूं लागले, इतकेच नव्हे तर त्याच्या बरोबर जो दुसरा मुका बनलेला साथीदार होता त्याच्यापासून ही ते आशीर्वाद मागू लागले . अशा रीतीने स्पॉनश लोकांना फसवून तोच शिपाई नेपोलियनजवळ सुरक्षित येऊन पोहोचला आणि नेपोलियनला ती बातमी कळताक्षणीच त्याने तो वेढा उठविण्याची तजवीज केली .

      मित्रानो हा लेख गोष्टी तुम्हाला आवडले असेल तर याच्यावर नकी प्रतिक्रीया द्या.

No comments:

Post a comment